|Thursday, October 18, 2018
You are here: Home » Top News » शेतकऱयांना गोळी घालणारे त्यांना काय न्याय देणार ? अशोक चव्हाण

शेतकऱयांना गोळी घालणारे त्यांना काय न्याय देणार ? अशोक चव्हाण 

पुणे / प्रतिनिधी :

सत्तेत येऊन तीन वर्षाचा कालावधी लोटल्यानंतरही शेतकऱयांचे प्रश्न सोडविण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. शेतकऱयांना आजही आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱयांच्या छातीत गोळी मारण्यापेक्षा पायावर गोळी मारता आला असती, अशी भाषा करणारे हे सरकार शेतकऱयाला काय न्याय देणार, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी येथे उपस्थित केला.

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त पुणे शहरात आयोजित कार्यक्रमावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.

शेवगाव तालुक्मयातील घोटण व खानापूर परिसरात ऊसदर वाढीसाठी शेतकऱयांनी आंदोलन व रास्तारोको केले. यावेळी आंदोलक शेतकऱयांना पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात दोन शेतकरी जखमी झाले. याबाबत चव्हाण यांना विचारले ते म्हणाले, ही घटना निषेधार्ह आहे. आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱयांवर गोळीबार करणे, ही दडपशाही आहे. त्यात भाजपा नेते ‘छातीऐवजी पायावर गोळी मारता आली असती,’ असे वक्तव्य करीत असतील, तर त्यातून हे सरकार कुठे चाललेय, हे स्पष्ट होते. शेतकऱयांना अशा पद्धतीने गोळय़ा घालणारे हे सरकार त्यांना काय न्याय देणार?

Related posts: