|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » उद्योग » ई कारसाठी सुझुकी, टोयोटा यांची भागीदारी

ई कारसाठी सुझुकी, टोयोटा यांची भागीदारी 

नवी दिल्ली :

भारतात ईलेक्ट्रिक कार उतरविण्यासाठी जपानच्या सुझुकी मोटार कॉर्पोरेशनने टोयोटो मोटार कॉर्पोरेशनबरोबर भागीदारी केल्याचे जाहीर केले. या भागीदारीनुसार 2020 पर्यंत ईलेक्ट्रिक कार बाजारात उतरविण्यात येईल. भारतीय बाजारासाठी सुझुकीकडून ईलेक्ट्रिक कारचे उत्पादन घेण्यात येईल. याचप्रमाणे टोयोटासाठी काही वाहनांचा पुरवठा करण्यात येईल. या भागीदारीनुसार टोयोटाकडून तांत्रिक साहाय्य पुरविण्यात येईल. भारतात ईलेक्ट्रिक कार उतरविण्यासाठी दोन्ही कंपन्यांकडून बाजारपेठेचा अभ्यास करण्यात येईल. कार चार्जिंगसाठी पायाभूत सेवा उभारणे, विक्रीपश्चात सेवा देणे, बॅटरीची आयुष्यमर्यादा उंचावणे यांचा समावेश आहे. सुझुकीने यापूर्वीच गुजरातमधील प्रकल्पात लिथिमय आयन बॅटरीचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. मेक इन इंडियातर्गत कार व्यतिरिक्त अन्य सामग्रीचे निर्मिती करण्यात येईल.

Related posts: