|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » उद्योग » ‘सॅमसंग’तर्फे स्मार्ट ‘द प्रेम’ टीव्ही बाजारात

‘सॅमसंग’तर्फे स्मार्ट ‘द प्रेम’ टीव्ही बाजारात 

पुणे

सॅमसंग इंडियाने स्मार्ट टीव्ही तसेच वॉल प्रेमचा जिवंत अनुभव देणारा ‘द प्रेम’ हा स्मार्ट टीव्ही शुक्रवारी बाजारात दाखल केला. 55 इंच आणि 65 इंचमध्ये हा टीव्ही बाजारात उपलब्ध आहे. 55 इंची टीव्ही 2, 74,900, तर 65 इंची 3,99,900 रुपये अशी यांची किंमत आहे. साधारणपणे टीव्ही बंद झाल्यानंतर हा टीव्ही आर्ट मोडमध्ये जातो. त्यानंतर भिंतीवर ज्याप्रमाणे प्रेम लावली जाते त्यानुसार हा टीव्ही काम करतो.

सॅमसंगने यासाठी आर्ट स्टोअरमध्ये 100 कलाकृती तसेच एखादा फॅमिली फोटो प्रेममध्ये लावू शकतो. तसेच सॅमसंगने या प्रेम्ससाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी करार केला असून, सब्सक्राईब करून ते ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. ब्राइटनेस सेन्सर आणि मोशन सेन्सर असे दोन्ही पर्याय वापरून द प्रेममध्ये विविध प्रकारच्या मोड्समध्ये स्विच करता येते. ब्राइटनेस सेन्सर अगदी सहज आसपासच्या प्रकाशाप्रमाणे बदलले जाते. त्यामुळे द प्रेम खऱया अर्थाने वापरकर्त्याच्या घराचाच एक भाग बनून जातो. तर मोशन सेन्सरमुळे रूममध्ये कोणी आले वा तेथून कोणी बाहेर पडले हे द प्रेमला कळते. यामुळे कोणीही टीव्ही पाहत नसताना तो पॉवर सेव्हिंग मोडवर जातो आणि आसपास कोणाची चाहूल लागताच आपोआप सुरू होतो. या टीव्हीमध्ये वॉलनट, बेज वूड आणि व्हाईट या रंगांमध्ये बदलत्या येण्याजोग्या प्रेम्सचे वैयक्तिक पर्याय आहेत, असे सॅमसंग इंडियाचे महाव्यवस्थापक पियुष कुन्नापल्ली यांनी सांगितले.

Related posts: