|Friday, October 19, 2018
You are here: Home » उद्योग » वनप्लस 5टी भारतात सादर

वनप्लस 5टी भारतात सादर 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

प्रिमियम प्रकारात स्मार्टफोन बनविण्यासाठी प्रसिद्ध असणाऱया वनप्लस या चिनी कंपनीने वनप्लस 5टी हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर केला. न्यूयॉकमधील आयोजित कार्यक्रमादरम्यान हा स्मार्टफोन आंतरराष्ट्रीय पातळीवर उतरविण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये फेस अनलॉक सुविधेचा वापर करण्यात आला आहे. याव्यतिरिक्ती स्क्रीन 2.5 डी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चे संरक्षण देण्यात आले आहे. वनप्लस 5 ला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी हा स्मॉर्टफोन दाखल केल्याचे सीईओ पेटे लाऊ यांनी म्हटले. ऍमेझॉन, वनप्लस स्टोअर आणि बेंगळुरातील वनप्लस एक्सपरियन्स स्टोअर्समध्ये 21 नोव्हेंबरपासून उपलब्ध होईल. 28 नोव्हेंबरपासून स्मार्टफोनची खुली विक्री सुरू होईल. मिडनाईट ब्लॅक रंगामध्ये उपलब्ध असून 64 जीबी आणि 128 जीबी प्रकारात अनुक्रमे रु 32,999 आणि 37,999 रुपये किंमत आहे. भारतातील प्रिमियम स्मार्टफोन बाजारात वनप्लसचा हिस्सा 12 टक्के असून गेल्या दोन तिमाहीत त्याच्यात 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 

स्मार्टफोनची वैशिष्टय़े :

डिस्प्ले 6.01 इंच

रिअर कॅमेरा 16, 20 मेगापिक्सल

सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सल

रॅम 6 जीबी, 8 जीबी

स्टोरेज 64 जीबी, 128 जीबी

ऑपरेटिंग प्रणाली ऍन्ड्रॉईड 7.1.1

प्रोसेसर स्नॅपड्रगन 835

बॅटरी 3300 एमएएच

Related posts: