|Friday, July 20, 2018
You are here: Home » उद्योग » चार वर्षात देशात 200 कोटीची आयओटी उपकरणे

चार वर्षात देशात 200 कोटीची आयओटी उपकरणे 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील नागरिकांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. पुढील तीन ते चार वर्षात इंटरनेट ऑफ थिंग्सचा (आयओटी) वापर 10 पटीने वाढण्याची शक्यता आहे. आयओटी उपकरणांची विक्री 200 कोटी रुपयांवर पोहोचेल असे माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. असोचॅमच्या वतीने आयोजित इंटरनॅशनल टेक्नोलॉजी समिटमध्ये ते बोलत होते.

 सध्या देशात 20 कोटी रुपयांच्या आयओटी उपकरणांचा वापर होत आहे. पुढील चार वर्षांत यात वेगाने वाढ होईल. तंत्रज्ञानाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनामुळे या उपकरणांची विक्री वाढणार आहे. नवीन तंत्रज्ञान भारतीयांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. सायबर सुरक्षेसाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहे. पुढील पाच ते सात वर्षात भारतीय डिजिटल अर्थव्यवस्था 1 लाख कोटी डॉलर्सची होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. आयओटी, मशिन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा या भारतीयांच्या आयुष्यात मोठय़ा भूमिका बजावतील असे त्यांनी म्हटले. इंटरनेटच्या साहाय्याने उपकरणांचे नियंत्रण करण्यात येते त्यांना आयओटी असे म्हणतात.

Related posts: