|Friday, October 19, 2018
You are here: Home » उद्योग » मूडीजच्या मानांकन सुधारणेने बाजारात तेजी

मूडीजच्या मानांकन सुधारणेने बाजारात तेजी 

बीएसईचा सेन्सेक्स 236, एनएसईचा निफ्टी 69 अंशाने मजबूत

वृत्तसंस्था/ मुंबई

मूडीजने भारताचे मानांकन सुधारल्याने त्याचे बाजारात पडसाद दिसून आले. सेन्सेक्स 400 पेक्षा जास्त अंशाने मजबूत झाला, तर निफ्टी 130 अंशाने वधारला होता. मात्र दुपारनंतर बाजारात नफा कमाई दिसून आली. दिवसभरात निफ्टी 10,343 पर्यंत पोहोचला, तर सेन्सेक्स 33,520 पर्यंत वधारला होता. बँक निफ्टी मात्र नवीन विक्रमी पातळीवर बंद होण्यात यशस्वी झाला.

बीएसईच्या सेन्सेक्समध्ये 236 अंशाची तेजी येत 33,343 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 69 अंशाच्या तेजीने 10,284 वर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागातही तेजी आली होती. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 1 टक्क्यांनी वधारत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 1 टक्क्यांनी मजबूत झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.8 टक्क्यांनी वधारत बंद झाला.

बँकिंग, वाहन, एफएमसीजी, धातू, औषध, रिअल्टी, ग्राहकोपयोगी वस्तू आणि ऊर्जा समभागात चांगली खरेदी झाली. बँक निफ्टी 1.1 टक्क्यांनी मजबूत होत 25,728 या विक्रमी पातळीवर बंद झाला. दिवसातील तेजीदरम्यान बँक निफ्टीने 25,925 पर्यंत मजल गाठली होती. निफ्टीचा पीएसयू बँक निर्देशांक 1 टक्का, वाहन निर्देशांक 0.9 टक्के, एफएमसीजी निर्देशांक 0.8 टक्के, धातू निर्देशांक 1.9 टक्के आणि औषध निर्देशांक 0.9 टक्क्यांनी वधारत बंद झाले, मात्र आयटी समभागात विक्री दिसून आली.

दिग्गज समभागांची कामगिरी

टाटा पॉवर, सिप्ला, एचडीएफसी, मारुती सुझुकी, टाटा स्टील, टाटा मोटर्स, 4.9-1.9 टक्क्यांनी वधारत बंद झाले. टेक महिंद्रा, इन्फोसिस, बॉश, टीसीएस, एचसीएल टेक, एशियन पेन्ट्स, ओएनजीसी, विप्रो 3.1-1 टक्क्यांनी घसरले.

मिडकॅप समभागात अदानी एन्टरप्रायजेस, श्रीराम ट्रान्स्पोर्ट, मॅक्स फायनान्शियल, एनएलसी इंडिया, अजंता फार्मा 8-5 टक्क्यांनी वधारले. पेज इन्डस्ट्रीज, यूनायटेड बुअरीज, रिलायन्स इन्फ्रा, युनियन बँक, टोरेन्ट फार्मा 2.5-1.5 टक्क्यांनी घसरले.

स्मॉलकॅप समभागात बालाजी एमाईन्स, कोलते पाटील, पूर्वांकरा, स्मार्टलिंक नेट आणि स्नोमॅन लॉजिस्टिक 13.8-12 टक्क्यांनी मजबूत झाले. रेन इन्डस्ट्रीज, पिनकॉन स्पिरिट, एचईजी, एसटीसी इंडिया, व्ही. बी. इन्डस्ट्रीज 15-5 टक्क्यांनी मजबूत झाले.

Related posts: