|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » डॉ. बाबासाहेबांच्या फोटोची व्हाट्सअप ग्रुपवर विटंबना

डॉ. बाबासाहेबांच्या फोटोची व्हाट्सअप ग्रुपवर विटंबना 

वार्ताहर/ औंध

व्ही. पी.प्रेंडस सर्कल या नावाच्या  व्हाट्सअप ग्रुपवर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोशी विडंबनात्मक छेडछाड केल्याने औंध येथील कुलदीप इंगळे यांनी अँडमीनसह फोटो टाकणाया मोबाईल क्रमांक धारकांविरुद्धची तक्रार दाखल केली आहे.वैभव भाऊसाहेब पवार रा.अंबवडे ता खटाव असे ग्रुप अँडमीन चे नाव असून त्याला औंध पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबतची माहिती अशी की व्ही. पी.प्रेंडस सर्कल  या व्हाट्सअप ग्रुपवर गुरुवारी सायंकाळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला आक्षेपार्ह चित्र लावून तो मेसेज या ग्रुपववर 9130754984 या मोबाईल क्रमांकवरून मेसेज टाकण्यात आला हा आक्षेपार्ह फोटो पाहिल्यानंतर औंध येथील कुलदीप इंगळे यांनी संबंधित व्यक्तीस दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले मात्र त्याव्यक्तीने नकार दिला. त्यानंतर कुलदीप इंगळे यांनी औंध पोलीस स्टेशनमध्ये येऊन व्ही.पी.प्रेंडसर्कल ग्रुपमधील 9130754984 या मोबाईल क्रमांकावर तसेच संबंधित ग्रुपच्या अँडमीन वर औंध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.

औंध येथे समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड व जनता क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने यांच्या नेतृत्वाखाली निषेध फेरी काढून या घटनेचा निषेध करण्यात आला. औंधसह परिसरात ही घटना समजताच कुलदीप इंगळे,गणेश इंगळे,प्रशांत सर्वगोड, सोमनाथ इंगळे,मंगेश इंगळे, केशव इंगळे दत्ता केंगारे, तसेच परिसरातील विविध गावातील कार्यकर्ते औंध येथे एकत्रित आले.यावेळी निषेध फेरी काढून याघटनेचा निषेध करण्यात आला तसेच  महापुरुषाची विटंबना  करणाया दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.अँडमीन ला औंध पोलिसांनी अटक करून वडूज न्यायालयात हजर करण्यात आले होते.सदर घटनेचा अधिक तपास सपोनि सुनील जाधव करीत आहेत.

Related posts: