|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आचरेकर प्रतिष्ठानने सांगितिक वारसा जपलाय!

आचरेकर प्रतिष्ठानने सांगितिक वारसा जपलाय! 

कणकवली

देशाला शास्त्राrय संगीताची मोठी परंपरा आहे. त्याचे पावित्र्य जपणे गरजेचे आहे. तेच काम वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान गेली वीस वर्षे करीत आहे. प्रतिष्ठानचे हे कार्य उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार कणकवलीच्या नगराध्यक्षा सौ. माधुरी गायकवाड यांनी काढले.

येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या 20 व्या संगीत महोत्सवाला शुक्रवारी प्रारंभ झाला. त्याचे उद्घाटन सौ. गायकवाड यांच्या हस्ते झाले. व्यासपिठावर सुप्रसिद्ध गायक पं. राजाभाऊ काळे, पं. जीतेंद्र अभिषेकी सघनगान शिक्षण केंद्राचे गुरू समीर दुबळे, प्रतिष्ठानचे वामन पंडित, संगीत शिक्षक बाळा नाडकर्णी, माधव गावकर, वसंतराव मराठे, प्रसाद कोरगावकर, राजा राज्याध्यक्ष, राजन राऊळ, सीमा कोरगावकर आदी उपस्थित होते.

गायकवाड म्हणाल्या, आचरेकर प्रतिष्ठानने संगीत महोत्सवाच्या माध्यमातून गेली वीस वर्षे सांगितिक वारसा जपला आहे. गेली दहा वर्षे पं. जीतेंद्र अभिषेकी सघनगान शिक्षण केंद्राच्या माध्यमातून अनेक गायक घडविले आहेत. प्रतिष्ठानने हे कार्य असेच सुरू ठेवावे. नगरपंचायतीमार्फत त्यांना नेहमीच सहकार्य केले जाईल.

राजाभाऊ काळे म्हणाले, संगीत हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. म्हणूनच शास्त्राrय संगीताच्या कार्यशाळा सतत होत राहणे गरजेचे आहे. अशा कार्यशाळांतूनच कलाकार घडत असतात. आचरेकर प्रतिष्ठानने केलेले कार्य लक्षणीय आहे.

समीर दुबळे म्हणाले, राजाभाऊ काळे यांच्यासारख्या मोठय़ा गायकाकडून मार्गदर्शन घेण्याची संधी आज येथील नवोदित गायकांना मिळाली आहे. पं. जीतेंद्र अभिषेकी कसे घडले, याचे राजाभाऊ हे साक्षीदार आहेत. या कार्यशाळेत मलाही त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळेल.

प्रास्ताविकात वामन पंडित म्हणाले, गेली वीस वर्षे आम्ही संगीत महोत्सव व दहा वर्षे शिक्षण केंद्र चालवित आहोत. गेल्या वीस वर्षांच्या परिश्रमाचे फळ आता दिसत आहे. अनेक नवोदित गायक उदयास येत आहेत. याचेच उदाहरण म्हणजे या महोत्सवात जिल्हय़ातीलच सात नवोदित गायकांचा ‘यमनदर्शन’ कार्यक्रम होत आहे.

उद्घाटन कार्यक्रमानंतर पं. राजाभाऊ काळे यांची शास्त्राrय संगीत रसग्रहण कार्यशाळा झाली. दोन सत्रात झालेल्या या कार्यशाळेत काळे यांनी विविध संगीतविषयक मार्गदर्शन व प्रात्यक्षिकही सादर केले. सायंकाळी प्रतिष्ठानच्याच पं. जीतेंद्र अभिषेकी सघनगान शिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांचा ‘यमनदर्शन’ हा कार्यक्रम रंगला होता. यात ईश्वरी तेजम, मनोज मेस्त्राr, मनीषा कोयंडे, विशाल वराडकर, पल्लवी पिळणकर, उमेश परब, वैदेही करंबेळकर हे गायक सहभागी झाले होते. त्यांना संवादिनीसाथ माधव गावकर व तबला साथ प्रसाद करंबेळकर यांनी केली.

आज कोमकली, काळे यांचे गायन

शनिवारी सायंकाळी 7 वाजता समीर दुबळे आणि पं. जयश्री पाटणेकर यांचे शिष्य व उद्ययोन्मुख गायक नीतेश धाक्रस यांचे गायन, रात्री 8 वा. पं. कलापिनी कोमकली यांचे गायन, रात्री 9.30 वा. पं. राजा काळे यांचे गायन होणार आहे. यात संवादिनीसाथ सुयोग कुंडलकर, तर तबला साथ प्रशांत मडव करणार आहेत. संगीतप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

Related posts: