|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » Top News » अनिकेत कोथळेचे मारेकरी पोलिस सेवेतून बडतर्फ

अनिकेत कोथळेचे मारेकरी पोलिस सेवेतून बडतर्फ 

ऑनलाईन टीम / सांगली :

सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीत अनिकेत कोथळेचा मृत्यू आणि प्रकरण दडपून टाकण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोलीत नेऊन जाळल्याप्रकरणी निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह आणखी पाच पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे- पाटील,जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी ही कारवाई केली आहे.या कारवाईचा अहवाल राज्याचे पोलिस महासंचालक यांनाही सादर करण्यात आला आहे.पीएसआय यीवराज कामटेसह हवालदार अनिल लाड,अरूण टोणे,राहुल शिंगटे ,नसरूद्दीन मुल्ला अशी बडतर्फ केलेल्या पोलिसांची नावे आहेत.

Related posts: