|Monday, October 15, 2018
You are here: Home » Top News » रेल्वे ट्रकवर काम करणाऱया तीन महिलांना ट्रेनने उडवले

रेल्वे ट्रकवर काम करणाऱया तीन महिलांना ट्रेनने उडवले 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईतील पश्चिम रेल्वेमार्गावर शनिवारी रेल्वे रूळांच्या दुरूस्तीचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात तीन महिला मजुरांचा मृत्यू झाला. पश्चिम रेल्वेच्या मलाड आणि कांदिवली या स्थानकांदरम्यान दुपारी 12.30च्या सुमारास ही घटना घडली. ही लोकल बोरीवलीहून चर्चगेटच्या दिशेने जात होती.

गँगमॅन तसेच रेल्वे ट्रक दुरूस्तीच्या टीममध्ये या चार महिला होत्या. ट्रक दुरूस्ती करताना एकाच वेळी दोन – तीन ट्रेन येताना दिसल्या. परंतु कोणती लोकल कोणत्या ट्रकवर येणार याचा अंदाच महिलांना आला नाही. महिला मजूर काम करत असलेल्या ट्रकवर ही ट्रेन आली,यावेळी गोंधळ उडाल्याने ट्रेनने महिलांना जोरदार धडक दिली.यात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Related posts: