|Sunday, December 15, 2019
You are here: Home » मनोरंजन » सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये जान्हवीसोबात श्रीदेवी झळकणार?

सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये जान्हवीसोबात श्रीदेवी झळकणार? 

ऑनलाईन टीम / मुंबई  :

‘सैराट’ चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या ‘धडक’मध्ये जान्हवी कपूर आर्चीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर आर्चीच्या आईची व्यक्तिरेखा जान्हवीची रिअल लाईफ आई म्हणजेच श्रीदेवी साकारण्याची शक्मयता वर्तवण्यात येत आहे.

‘आर्चीच्या आईची व्यक्तिरेखा लहानशी असली, तरी महत्त्वपूर्ण आहे. ती ग्रेसफुल दिसायला हवी. तिने स्वतःचा आब राखायला हवा. आईचे बंडखोर लेकीवर जीवापाड प्रेम आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्टय़ा मागास समाजातील तरुणावर मुलीचे प्रेम असल्यामुळे वडिलांचा तिला प्रचंड विरोध आहे. मात्र अशा परिस्थितीतही आईने तिची बाजू उचलून धरली आहे.’ असे सिनेमाशी संबंधित सूत्रांनी सांगितलं आहे.

श्रीदेवी यांना सिनेमाची ऑफर देण्यात आली असून त्यांनी अद्याप आपलं उत्तर दिलेलं नाही. मात्र मुलीचं पदार्पण असल्यामुळे त्या ही ऑफर नाकारण्याची शक्मयता कमी आहे. सैराट चित्रपटाची कथा महाराष्ट्रात घडली होती, मात्र ‘धडक’ची कहाणी राजस्थानात घडताना दिसणार आहे.

 

Related posts: