|Thursday, December 13, 2018
You are here: Home » Top News » ‘पद्मावती’चित्रपट आधी मीडियाला दाखवल्यामुळे सेन्सर बोर्ड नाराज

‘पद्मावती’चित्रपट आधी मीडियाला दाखवल्यामुळे सेन्सर बोर्ड नाराज 

ऑनलाईन / प्रतिनिधी :

तांत्रिक गोष्टींचा हवाला देत सेन्सॉर बोर्डातने ‘पद्मावती’चित्रपटाची कॉपी परत पाठवल्याची बातमी ताजी होती.त्यातच आता सेन्सॉर बोर्डाला दाखवण्यापूर्वीच दोन न्यूज चॅनेलच्या संपादकांसाठी स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केल्याने बोर्डाने नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत बोलताना सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून म्हणाले,‘सिनेमा सेन्सॉर बोर्डाला दाखवण्यापूर्वीच,तसेच त्याला सीबीएफसीकडून प्रमाणपत्र मिळण्यापूर्वीच मीडियासाठी सिनेमाचे स्क्रिनिंग होणे,अतिशय दुर्देवी आहे. सध्या राष्ट्रीय न्यूज चॅनलमधून सिनेमाची समीक्षा होत आहे. सेन्सॉरच्या प्रक्रियेला कमी लेखून संधीसाधूपणाचे हे एक उदहारण आहे, जोशी म्हणाले.

पद्मावतीच्या रिव्हय़ू या आठवडय़ात निर्मात्यांकडून अर्ज मिळाला.कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे स्वतः निर्मात्यांनी मान्य केले होते.चित्रपट काल्पनिक आहे की, ऐतिहासिक त्याच्या डिसक्लेमरही टाकण्यात आले नव्हते.कागदपत्र मागितल्यानंतर बोर्डावर उलटा आरोप करणे चुकीचे आहे असे प्रसून जोशी म्हणाले.सध्या देशभरात ‘पद्मावती’च्या चित्रपटाला जोरदार विरोध होत आहे.

 

 

 

 

Related posts: