|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » गुजरातमध्ये परिवर्तन अटळ ; मोहन प्रकाश

गुजरातमध्ये परिवर्तन अटळ ; मोहन प्रकाश 

 पुणे / प्रतिनिधी  :

गुजरातमध्ये जीएसटीमुळे व्यापारी रस्त्यावर आले असून, बेरोजगारी मोठया प्रमाणात वाढली आहे. शेतकऱयांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. हार्दिक पटेलसारख्या तरूणांवर दडपशाही सुरू आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी व्यक्त केला

शहर काँग्रेसच्या वतीने पंडित भीमसेन जोशी कलादालन येथे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मोहन प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. मोहन प्रकाश म्हणाले, सध्याच्या सरकारकडून लोकांना केवळ वर्तमानातच रहायला लावले जात आहे. मात्र, या देशाला लाभलेला वैभवशाली इतिहास विसरता येणार नाही. इंदिरा गांधी यांनी बांग्लादेशाला पाकिस्तानपासून मुक्त करून स्वतंत्र केले. त्यांच्या या कर्तृत्वाची दखल संपूर्ण जगाला घ्यावी लागते. सिक्किमला भारताचा अविभाज्य भाग बनविण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. हा इतिहास आजच्या तरूण पिढीसमोर मांडला गेला पाहिजे. भारतीय उपखंडाचा इतिहास ज्यावेळी लिहिली जाईल, त्यावेळी इंदिरा गांधी यांचे नाव सुवर्णक्षरांनी लिहले जाईल.

इंदिरा गांधीवरील छायाचित्र प्रदर्शनामध्ये त्यांच्या बालपणापासून ते पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीपर्यंत अनेक छायाचित्रे लावण्यात आली आहेत. यामध्ये अनेक दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आहे. यातील अनेक छायाचित्रे आपणास पहिल्यांदाच पाहायला मिळाल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शहर काँग्रेसच्या वतीने एक चित्ररथ तयार करण्यात आला आहे. यामध्ये वसंतदादा पाटील यांच्या कार्याची थोडक्मयात ओळख करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर या चित्ररथामध्ये एक एलसीडी स्क्रीन बसविण्यात आली आहे. हा चित्ररथ पाहण्यासाठीही गर्दी झाली होती.

 

Related posts: