|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मोर्लेवासीयांचे उपोषण तूर्त स्थगित

मोर्लेवासीयांचे उपोषण तूर्त स्थगित 

महिन्याभरात काम सुरू करण्याचे आश्वासन

प्रतिनिधी / साटेली-भेडशी:

मोर्ले-पारगड रस्त्याचे काम महिन्याच्या आत सुरू करण्यात येईल, असे आश्वासन सावंतवाडी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी तीन दिवस सुरू असलेले उपोषण शुक्रवारी सायंकाळी मागे घेतले.

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जानेवारी 2016 मध्ये रस्त्याचे भूमिपूजन केले होते. त्यावेळी या रस्त्याचे काम महिन्याभरात सुरू होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र, रस्त्याच्या कामाला अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रदीप नाईक, रघुवीर शेलार, रमावती कांबळे, रेश्मा शेलार, सरपंच सुजाता मणेरीकर, महादेव गवस, पंकज गवस, मोर्ले व पारगडवासीयांनी उपोषण सुरू केले होते.

उपोषणच्या तिसऱया दिवशी उपवनसंरक्षक चव्हाण यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत महिन्याच्या आत रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. भूसंपादन करून शासनाच्या जीआरप्रमाणे नुकसान भरपाई मिळणार असल्याचे आश्वासनानंतर चव्हाण यांनी दिले. यावेळी प्रकाश पवार, ज्ञानेश्वर चिरमुरे, प्रकाश नाईक, पांडुरंग गवस, सरपंच विद्याधर बागे, आबा चव्हाण, प्रकाश चिरमुरे, सहाय्यक वनसंरक्षक सुभाष पुराणिक, वनक्षेत्रपाल आठवले, वनपाल देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विजय चव्हाण उपस्थित हेते.

Related posts: