|Tuesday, September 25, 2018
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

19 ते 25 नोव्हेंबर

मेष

शुक्र व बुधाचे राश्यांतर होत आहे. कलाक्रीडा क्षेत्रात नवीन संधी मिळेल. व्यवसायात जुनी येणी वसूल करण्याचा प्रयत्न करा. शेतीच्या कामात प्रगती संभवते. रविवारी व सोमवारी जीवनसाथीबरोबर चहाच्या पेल्यातील वादळे संभवतात. राजकीय व सामाजिक क्षेत्रात आता आपली घोडदौड असणार आहे. शत्रू आपले मित्र होण्याचा प्रयत्न करतील. आपल्या  विचारांना महत्त्व मिळेल. प्रवासात मात्र दगदग संभवते. वाहन खरेदीचा विचार मनात येईल.


वृषभ

अति आत्मविश्वास घातक ठरू शकतो. व्यवसायात गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. कुटुंबात ताण-तणाव वाढण्याचे चिन्ह दिसेल. जबाबदारीने वागावे व बोलावे लागेल. कोर्टाच्या कामात उतावळेपणा नको. अनाठायी पैसा व शब्द खर्च होण्याची शक्मयता आहे. प्रॉपर्टीच्या वाटाघाटीत तुमच्यावर आरोप येतील. शेतीच्या  कामात लक्ष देऊन काम केल्यास आर्थिक नुकसान भरून काढता येईल. विद्यार्थीवर्गाने अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावे.


मिथुन

आठवडय़ाची सुरुवात थोडी कटकटीची असली तरी पुढील दिवस चांगले आहेत. व्यवसायात मोठय़ा फायद्याची संधी मिळेल. सावधपणे निर्णय घ्या. राजकीय व सामाजिक क्षेत्रात विरोधक नमते धोरण घेतील. धनुराशीत बुधाचे राश्यांतर साहाय्य करणारे आहे. अहंकार व दादागिरी नको. मैत्रीच्या नात्याने वागा. समस्या सोडवा. विद्यार्थीवर्गाला यश मिळेल. संयम ठेवा. मुलांच्या प्रगतीची खबर मिळेल. वरि÷ांना कमी लेखू नका. नम्रता ठेवल्यास प्रश्न वाढणार नाही.


कर्क

धनुराशीत बुधाचे राश्यांतर व सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. मंगळवार, बुधवार राजकीय-सामाजिक कार्यात वाद निर्माण होऊ शकतो. वरि÷ांची मर्जी राखता येईल. लोकप्रियता वाढवता येईल. कोर्टाच्या कामात साहाय्य मिळेल. संसारात चांगली बातमी  उत्साह वाढवेल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी व लाभ मिळेल. वाटाघाटीत तणाव झाला तरी मार्ग शोधता येईल. शिक्षणात पुढे जाता येईल. धंद्यात थकबाकी वसूल करा.


सिंह

या आठवडय़ात ताणतणाव होईल. कठीण प्रसंग राजकीय- सामाजिक कार्यात निर्माण होतील. तुमचे वर्चस्व कमी करण्याचा  प्रयत्न होईल. गुप्त कारवायांचा त्रास भोगावा लागेल. गर्वि÷पणा ठेवू नका. मार्ग मिळेल. लोकांचे प्रेम व अनुभवी माणसांचे सहाय्य उपयुक्त ठरेल. कोर्टकेसमध्ये अडचणी येतील. धावपळ झाल्याने थकवा वाटेल. धंद्यातील चुका शोधून ठेवा. संधी पुढे मिळेल. विद्यार्थीवर्गाने अभ्यासावर लक्ष द्यावे.


कन्या

धनुराशीत बुध प्रवेश व सूर्य-चंद्र लाभयोग होत आहे. राजकीय- सामाजिक कार्यात प्रति÷ा राहील. अधिकार मिळवण्याचा प्रयत्न याच आठवडय़ात करा. मंगळवार, बुधवार गैरसमज होईल. राग वाढेल. धंद्यात फायदा होईल. कामगार वर्गाशी  जुळवून घ्या. तुमचा प्रेमळ स्वभाव व मैत्री करण्याची वृत्ती, यामुळे प्रगतीची संधी कला, क्रीडा क्षेत्रात मिळेल. प्रेमाला चालना मिळेल. संसारात सर्वांचे सहकार्य मिळेल. संततीला चांगली संधी मिळाल्याचे समाधान मिळेल.


तुळ

धनुराशीत बुधाचे राश्यांतर व शुक्र, प्लुटो लाभयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. प्रगतीची मोठी संधी मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात वरि÷ खूष होतील. शुक्रवार, शनिवार दुखापत संभवते. काळजी घ्या. वाहन जपून चालवा. विरोधकांना संधी देऊ नका. कला, क्रीडा क्षेत्रात पुरस्कार व आर्थिक लाभ मिळेल. नवीन परिचय फायदेशीर ठरेल. धंदा वाढेल. अविवाहितांना लग्नासाठी स्थळे मिळतील. शिक्षणात यश मिळेल.


वृश्चिक

तुमचा आत्मविश्वास टिकून राहिल्याने कोणत्याही प्रसंगावर मात करू शकाल. कुठेही अतिरेकाने वागू नका. पैसा पाकीट सांभाळा. धंद्यात सुधारणा होईल. भावनेच्या आहारी जाऊ नका. राजकीय, सामाजिक कार्यात जास्त काम करावे लागेल. घरातील व्यक्तींना दुखवू नका. नवीन ओळख झालेल्या व्यक्तीवर एकदम विश्वास टाकू नका. प्रेमात फसगत होईल. सावध रहा. विद्यार्थी वर्गाने आळस करू नये. खाण्याची काळजी घ्या.


धनु

धनुराशीत बुधाचे राश्यांतर व शुक्र, प्लुटो लाभयोग होत आहे. रविवार, सोमवार राजकीय, सामाजिक क्षेत्रात अपमानास्पद वागणूक मिळेल.  विनायक चतुर्थीपासून समस्या कमी होईल. विरोधक वेगळय़ा प्रकारची टीका करतील. भयभीत करण्याचा प्रयत्न करतील. नोकरीत वरि÷ांना दुखवू नका. कामाचा व्याप वाढेल. संसारात जबाबदारी स्वीकारावी लागेल. प्रेमाची माणसे मदत करतील. धंद्यात सुधारणा करता  येईल. जिद्दीनेच प्रश्न सोडवता येईल.


मकर

महत्वाचे प्रश्न सोडवा. चर्चा करा. याच आठवडय़ात मार्ग मिळेल. बोलतांना मंगळवार, बुधवार सावध रहा. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा राहील. धनु राशीत बुध प्रवेश व चंद गुरु लाभयोग होत आहे. लोकांच्यासाठी कार्य करा. प्रेम मिळवा. योजना पूर्ण करा, यश खेचता येईल. धंद्यात सावधपणे निर्णय घ्या. कोर्टाच्या कामात प्रगती होईल. शिक्षणात उन्नती होईल. कायद्याच्या विरोधात जाऊ नका.


कुंभ

राजकीय, सामाजिक क्षेत्रात सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाचा निर्णय घ्या. शुक्रवार, शनिवार संतापजनक घटना घडण्याची शक्मयता आहे. प्रवासात सावध रहा. धनुराशीत बुध प्रवेश व शुक्र, प्लुटो लाभयोग होत आहे. तुमची प्रति÷ा व लोकप्रियता वाढेल. कार्य जोरात सुरू ठेवा. धंद्यात वाढ करता येईल. शेअर्समध्ये गुंतवणूक योग्य सल्याने करा. संसारात सुखाचे क्षण येतील. घुप्तकारवायांपासून सावध रहा. कलेत प्रगती होईल.


मीन

धनुराशीत बुध प्रवेश व सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. या सप्ताहात सर्वच क्षेत्रातील समस्या कमी करण्याचा प्रयत्न करू शकाल. भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ घाला. मोहाला बळी पडू नका. कोर्टकेसमध्ये साहाय्य मिळेल. आशादायक परिस्थिती तुमच्या बाजूने राहील. राजकीय, सामाजिक कार्यात लोकाना दुखवू नका. कार्य करत रहा. धंद्यात प्रगती होईल. मौल्यवान वस्तू सांभाळा.कला क्रीडा क्षेत्रात तडजोड करावी लागेल.

Related posts: