|Sunday, October 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वेंगुर्ल्यात पुन्हा तीन पर्ससीनवर कारवाई

वेंगुर्ल्यात पुन्हा तीन पर्ससीनवर कारवाई 

वार्ताहर / वेंगुर्ले:

मिनी पर्सनेटद्वारे मासेमारी करणाऱया उभादांडा व नवाबाग येथील एकूण तीन नौकांना कोस्टल पोलीस पथकाने शनिवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास ‘अस्मिता’ गस्ती नौकेद्वारे पकडले. या तिन्ही मिनी पर्सनेट पुढील कारवाईसाठी मत्स्यखात्याचे परवाना अधिकारी श्री. देसाई यांच्या ताब्यात देण्यात आल्या. गेल्या दोन दिवसातील ही दुसरी कारवाई आहे.

वेंगुर्ले समुद्रकिनारपट्टीवरील ‘लाईट हाऊस’ नजिकच्या 5 ते 6 वाव खोल पाण्यात ‘बांगडा’ मासळी पर्सनेट जाळय़ाद्वारे पकडताना कोस्टल पोलीस पथकाचे पोलीस उपनिरीक्षक टी. व्ही. कळसुलकर, सागरी सुरक्षाचे पोलीस उपनिरीक्षक एस. एल. धुरत, पोलीस कॉन्स्टेबल डी. एस. कोयंडे, मास्टर एम. ए. रोईलकर या पथकाने ‘अस्मिता’ या गस्ती नौकेद्वारे ही कारवाई करण्यात आली. यामध्ये उभादांडा भागातील अक्षरा अमोल गोखरणकर यांची ‘निलरत्न’, मिथिला फर्नांडिस यांची ‘मॉर्निंग स्टार’, तर नवाबाग येथील नामदेव बापू केळुसकर यांची ‘चैत्राली’ या नौकांचा समावेश होता.

Related posts: