|Saturday, October 20, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गुन्हेगार तुरुंगात किंवा यमलोकात !

गुन्हेगार तुरुंगात किंवा यमलोकात ! 

योगी आदित्यनाथांचे वक्तव्य

वृत्तसंस्था / मुजफ्फरनगर

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी मुजफ्फरनगरमध्ये एका सभेला संबोधित केले. 15 वर्षांपर्यंत राज्यात पोलीस गुन्हेगारांकडून मार खात होते.  भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पोलिसांमध्ये उत्साह संचारला असून गुन्हेगारांच्या विरोधात कठोरपणे कारवाई केली जातेय. गुन्हेगार आता एक तर तुरुंगात दिसून येत आहेत किंवा यमलोकात जात असल्याचे वक्तव्य योगींनी केले.

सर्व शहरांमधील रस्ते अतिक्रमणमुक्त करून वाहतूक कोंडीपासून कायमची सोडवणूक करू. याचबरोबर स्वच्छता आणि पेयजलाची उत्तम व्यवस्था केली जाईल. सरकारने या सुधारणांकरता अगोदरच सर्वेक्षण करविले आहे. कोणतीही समस्या निर्माण झाल्यास लोकांनी प्रशासनाला कळवावे. सरकार त्यावर त्वरित पाऊल उचलेल असा दावा योगींनी केला.

खंडणी मागण्याची हिंमत नाही

4 वर्षांपूर्वी मुजफ्फरनगरने दंगलीचा त्रास झेलला. माझ्यासाठी गोरखपूरप्रमाणेच मुजफ्फरनगर आहे. भाजपच्या सरकारने राज्यात कायद्याचे राज्य स्थापन करण्याचे काम केले आहे. राज्यातील अवैध कत्तलखाने बंद करविले, राज्यात आमच्या शासनकाळात अजून एकही दंगल झालेली नाही. राज्यात कोणत्याही व्यापारी किंवा उद्योजकाकडून खंडणी मागण्याची हिंमत आज कोणामध्ये नसल्याचे वक्तव्य योगींनी केले.

सर्व आश्वासने पूर्ण करू!

राज्यातील युवकांना रोजगारासाठी इतरत्र जावे लागू नये याकरता सरकार विकासाचे वातावरण निर्माण करत आहे. भाजप पालिका निवडणूक केवळ जिंकण्यासाठी लढत असून सर्वांगीण विकासाच्या योजनेची अंमलबजावणी व्हावी याकरता पावले उचलत आहे. भाजपने दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण केले जाईल असे योगी म्हणाले.

Related posts: