|Saturday, December 15, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दिल्लीत बोलावत आहेत ओबामा, जाणार का?

दिल्लीत बोलावत आहेत ओबामा, जाणार का? 

नवी दिल्ली

 अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा पुढील महिन्याच्या प्रारंभी म्हणजेच 1 डिसेंबर रोजी नवी दिल्लीत असतील. परंतु यावेळी ते कोणत्याही अधिकृत दौऱयावर नसणार आहेत. ओबामा फौंडेशन या स्वतःच्या स्वयंसेवी संस्थेद्वारे आयोजित ‘टाउन हॉल’ या कार्यक्रमात ते सहभागी होतील. या कार्यक्रमात ते देशभरातून आलेल्या तरुणाईशी थेट संवाद साधणार आहेत. याचे निमंत्रण स्वतः ओबामांनीच दिले. ओबामा हे जगभरातील तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. पुढील महिन्यात 1 डिसेंबर रोजी दिल्लीच्या टाउन हॉल कार्यक्रमात भाग घेऊन. भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये चांगले काम करणाऱया तरुण-तरुणींना भेटू इच्छितो. कार्यक्रमाच्या माध्यमातून ही तरुणाई कशाप्रकारे स्वतःच्या समाजासाठी काम करत आहे हे जाणून घेऊ इच्छितो. ओबामा फौंडेशन त्यांच्या या कामात कशाप्रकारे मदत करू शकते हे देखील पाहीन असे ओबामांनी चित्रफितरुपी संदेशात म्हटले.

ओबामांच्या टाउन हॉल कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल तर Obama.org/india   वर जात एक ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. जर या कार्यक्रमाकरता निवड झाली तर संबंधिताला ई-मेलद्वारे निमंत्रण मिळेल. जर याचे निमंत्रण मिळाले नाही किंवा कोणत्याही कारणास्तव जाता आले नाही तर हा कार्यक्रम ओबामा फौंडेशनच्या फेसबुक पेजद्वारे 1 डिसेंबर रोजी पाहता येणार आहे.

Related posts: