|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शरद यादव गटाने निवडले ‘ऑटो रिक्षा’ चिन्ह

शरद यादव गटाने निवडले ‘ऑटो रिक्षा’ चिन्ह 

नवी दिल्ली

 निवडणूक आयोगाच्या निर्णयाने नाराज शरद यादव यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत पक्षाच्या चिन्हाची कमतरता नसल्याचा दावा केला. गुजरात निवडणुकीत ऑटो रिक्षा हे चिन्ह वापरून उमेदवार उभे करू, जागावाटपाबद्दल काँग्रेसशी चर्चा सुरू असल्याचे शरद यादव म्हणाले.यादव यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आता खरी लढाई जनतेत जाऊन होईल असे म्हटले. आयोगाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देऊ अशी घोषणा त्यांनी केली. आयोगाच्या निर्णयामुळे नितीश कुमार यांना आनंद झाला असला तरीही भविष्यात हा निर्णय बदलू शकतो.

आयोगाच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालय आणि प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ असे वक्तव्य शरद यादव गटाचे वकील आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केले. निवडणूक आयोगाने संजदच्या चिन्हाबद्दल मोठा निर्णय देत त्यावर नितीश गटाचा दावा मान्य केला होता.

Related posts: