|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अभिनेता राहुल रॉयचा भाजपमध्ये प्रवेश

अभिनेता राहुल रॉयचा भाजपमध्ये प्रवेश 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अभिनेता राहुल रॉय याने शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्याने पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्त्वाखाली देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. या विकासामध्ये योगदान देण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माझ्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, असे राहुल रॉय याने सांगितले. 1990 मध्ये आशिकी या हिंदी चित्रपटातून राहुल रॉय याने बॉलीवूडमधील आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला. मात्र त्यानंतर त्याला बॉलीवूडमध्ये समाधानकारक यश मिळाले नाही. काही वर्षांपूर्वी बिग बॉस या रिऍलिटी शोमधून त्यांनी छोटय़ा पडद्यावर पदार्पण केले. या शोचा तो पहिला विजेता ठरला होता.

Related posts: