|Thursday, October 18, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » काँग्रेस-राष्ट्रवादीची गुजरातमध्ये आघाडी

काँग्रेस-राष्ट्रवादीची गुजरातमध्ये आघाडी 

वृत्तसंस्था/ कातिहार (बिहार)

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी होईल. केंद्र सरकारच्या कामगिरीवर देशातील सर्वसामान्य जनता नाराज आहे, गुजरात विधानसभा निवडणुकीत निकालात भाजपविरोधातील रोष मतदानातून व्यक्त होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रसचे सरचिटणीस तारिक अन्वर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. गुजरात विधानसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेसला पूर्ण समर्थन देणार आहोत. गेली 22 वर्ष या राज्यात भाजपचे सरकार आहे. राज्यातील जनतेचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. गुजरात विधानसभा निवडणूक ही हिमाचल प्रदेशबरोबरच होणे गरजेचे होते. मात्र केंद्र सरकारने निवडणूक आयोगावर दबाव टाकून 9 व 14 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात निवडणूक घेण्यास भाग पाडले, असे आरोपही त्यांनी यावेळी केले. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या पुत्राच्या कंपनीच्या संपत्तीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या आरोपानंतर भाजपसह केंद्र सरकार अमित शहा कुटुंबीयांचा समर्थनात उतरली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

Related posts: