|Tuesday, January 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अपघातग्रस्तांच्या मदतीला पालकमंत्री धावले

अपघातग्रस्तांच्या मदतीला पालकमंत्री धावले 

 

लातूर -औसा तालूक्यातील चलबुर्गा फाटय़ाजवळ बस आणि ट्रकचा अपघात झाल्याची चर्चा कानी पडताच पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांची मदत केली. संबंधित यंत्रणांना कामाला लावले. यामुळे गंभीर जखमींना उपचार मिळण्यास मदत झाली. पालकमंत्री यांचे अरविंद पाटील निलंगेकर हे देखील तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

            नियोजित कार्यक्रमानुसार पालकमंत्री संभाजी पाटील शनिवारी दुपारी औसा तालुक्यात होते. 3 वाजण्याच्या सुमारास चलबुर्गा फाटय़ाजवळ बस आणि ट्रक चा अपघात झाला. या अपघातात अनेकजण जखमी झाल्याची तसेच मृत्यू पडल्याची वार्ता पालकमंत्र्यांच्या कानी पडली हे ऐकताच ते तेथून तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले. घटनास्थळावरील चित्र पाहून पालकमंत्री ही सुन्न झाले. या प्रसंगात जखमीवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी घटनास्थळावरुनच त्यांनी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले.

आरोग्य विभाग, रुग्णवाहिका, पोलिसयंत्रणा यांना सुचना करत जखमी रुग्णांना औसा आणि जवळच्या रुग्णालयात पोहचविण्याची व्यवस्था करुन दिली. खुद्द पालकमंत्री जातीने घटनास्थळावर हजर असल्याने जखमींना वेळेत उपचार मिळू शकले. यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकले. पालकमंत्री संभाजी पाटील घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच त्यांचे धाकटे बंधू अरविद पाटील तेथे पोहोचले होते त्यांनीही पालकमंत्री तसेच अधिकार्यांनाही घटनेची माहिती देऊन मदत कार्याला वेग दिला.

पालकमंत्र्यांसोबत खा. डॉ. सुनिल गायकवाड, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत,  जि.प.चे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जि.प.चे कृषी सभापती बजरंग जाधव, अप्पर पोलिस अधिक्षक काकासाहेब डोळे, निलंग्याचे उपविभागीय अधिकारी रांजणकर, औश्याचे पोलिस उपअधिक्षक गणेश  किंद्रे,, निलंग्याचे पोलिस निरीक्षक कल्याण सुपेकर, सुनिल उटगे, प्रविण कस्तुरे यांनीही घटनास्थळी अपघताग्रस्तांची मदत केली

Related posts: