|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » फ्लॅट फोडून तीन लाखाचा ऐवज लंपास

फ्लॅट फोडून तीन लाखाचा ऐवज लंपास 

प्रतिनिधी/ सांगली

सांगली-तासगाव रोडवरील बायपास जवळील एका अपार्टमेंटमधील बंद फ्लॅट फोडून चोरटय़ांनी भर दिवसा साडेआठ तोळय़ांच्या दागिन्यासह सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केला. या चोरीची विश्रामबाग पोलिसांत नेंद झाली आहे. दरम्यान भरदिवसा चोरटय़ांनी डल्ला मारल्याने नागरिकांत खळबळ उडाली आहे.

सांगली-तासगाव रोडवरील बायपास रोड जवळील ग्रॅसिया अपार्टमेंटमध्ये संकेत शिवाजी उनउने हे पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. ते मूळचे तासगाव तालुक्यातील सावळज येथील असून ते हॉटेल व्यावसायिक आहेत. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शाळेत कार्यक्रम असल्याने संकेत उनउने हे पत्नी आणि दोन मुलांसह शाळेत गेले ते बारा वाजता शाळेत आले असता. फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरटय़ांनी चोरी केल्याचे निदर्शनास आले. या चोरीची माहिती त्यांनी लगेच विश्रामबाग पोलिसांत दिली. पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांच्या नेतृत्वाखालील पथक घटना स्थळी दाखल झाले. चोरटय़ांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेले सात तोळय़ाचे मणीमंगळसूत्र, एक तोळय़ाची चेन, आणि अर्धा तोळय़ाची अंगठी असे साडेआठ तोळे सोने व रोख 15 हजार असा सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केला. कपाटातील साहित्य विस्कटले होते. कपाटाला लॉक नसल्याने ऐवज सहजासहजी त्यांच्या हाताला लागला. पोलिसांनी पंचनामा करून रात्री उशिरा या चोरीची नोंद केली.

दोनच दिवसापूर्वी शहराच्या गजबजलेल्या गणपती पेठ परिसरात चोरटय़ांनी रात्रीत सहा दुकाने फोडल्याचा प्रकार ताजा असताना शनिवारी भरदिवसा फ्लॅट फोडून चोरी केल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच शहरात चोरीची मालिका सुरू झाली असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

शंभर फुटी परिसरात आणखी एक फ्लॅट फोडला

दरम्यान, विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील शंभर फुटी परिसरात शनिवारी आणखी एक फ्लॅट भरदिवसा फोडल्याचा प्रकार उघडकीस आला. यामध्येही लाखोंचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला आहे. भरदिवसा या पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटना घडूनही पोलीस मात्र दिवसभर सुस्तच होते. दुपारपासून रात्री उशीरापर्यंत

 

 

Related posts: