|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » Top News » सोलापूरात भरधाव ट्रकच्या धडकेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

सोलापूरात भरधाव ट्रकच्या धडकेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / सोलापूर  :

चहाची तलफ लागल्याने चहा पिण्यासाठी बाइकवरून जाणाऱया तीन विद्यार्थ्यांचा रस्ते अपघतात मृत्यू झाला. भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे हे तिन्ही विद्यार्थी ठार झाले. आज पहाटे ही दुर्देवी घटना घडली.

संगमेश माळगे (वय 21), दीपक गुमडेल (वय 22) आणि अक्षय आसबे (वय 21) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे असून ते तिघेही सोलापूरजवळील तळे हिप्परगा येथील आर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होती. अभ्यासासाठी त्यांनी महाविद्यालयातच मुक्काम केला होता. पहाटे तीनच्या सुमारास चहा पिण्यासाठी ते तळे हिप्परगा येथील कँटिनवर आले होते. याचवेळी महामार्गावरून जाणाऱया भरधाव ट्रकने तिघांना उडवले. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले होते. पोलीस व परिसरातील नागरिकांनी त्यांनी त्वरीत रूग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी त्वरीत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. माळगे व गुमडेल हे सोलापूर शहरात राहत होते तर आसबे हा विद्यार्थी पंढरपूर तालुक्मयातील शेळवे येथील होता. अपघातामुळे या पसिरात हळहळ व्यक्त होत आहे. 

Related posts: