|Monday, December 17, 2018
You are here: Home » Top News » एकाच कुटूंबातील तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार

एकाच कुटूंबातील तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार 

ऑनलाईन टीम / लातूर :

एकाच घरातील तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित मुली या आपल्या आईसोबत राहतात, त्यांच्या नात्यातीलच एका इसमाने ओळखीचा फायदा घेत तीनही मुलींशी शारीरिक संबंध ठेवले.

लातूर शहरात या तीनही मुली आपल्या आईसोबत राहतात. आरोपीने ओळखीचा फायदा घेत सतरा, चौदा आणि अकरा वर्षांच्या या तीनही मुलींसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र सततच्या अत्याचाराला कंटाळून सतरा वर्षांच्या मुलीने गांधी चौक पोलिस स्टेशन गाठले आणि या प्रकाराचा उलगडा झाला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. तीनही मुलींची वैद्यकीय तपासणी सुरु असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढचा तपास केला जाणार आहे. आरोपीवर कलम 376 (2)(ह )कलम 4 ,6 ,8 अंतर्गत पॉक्सो लावण्यात आला आहे . लातूरसारख्या शहरात नात्यातील इसमानेच अशाप्रकारे तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याने सर्वच जण हादरुन गेले आहेत.

 

Related posts: