|Thursday, November 15, 2018
You are here: Home » मनोरंजन » रिंकू राजगुरुच्या आई- बाबांचा सिनेमा प्रवेश

रिंकू राजगुरुच्या आई- बाबांचा सिनेमा प्रवेश 

सैराट चित्रपटातील आपल्या भूमिकेने सगळय़ांना याड लावणारी आर्ची म्हणजे रिंकू राजगुरूनंतर आता तिचे आई-वडीलही चित्रपटात काम करणार आहेत. रिंकूची आई आशा राजगुरु आणि वडील महादेव राजगुरु हे आगामी ‘एक मराठा लाख मराठा’ या चित्रपटातून मोठय़ा पडद्यावर झळकणार आहेत. 24 नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

‘एक मराठा, लाख मराठा’ हा चित्रपट शेतकरी कुटुंबात राहणाऱया एका तरुणावर आधारित आहे. या चित्रपटात हा तरुण आपल्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असतो. कालांतराने त्याच्या संघर्षाचे रुपांतर मोठय़ा जनआंदोलनात होते. मात्र, हे झालेले रुपांतर त्याला कळत नाही. त्याच्यासमोर केवळ एकच लक्ष्य असते आणि ते म्हणजे आपल्या बहिणीला न्याय मिळवून देणे. ‘एक मराठा लाख मराठा’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन साताऱयाच्या गणेश शिंदे यांनी त्यांच्या साई सिने फिल्म्स निर्मिती संस्थेअंतर्गत केले आहे. अतुल लोहार आणि गणेश सातोर्डेकर यांनी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. तसेच मिलिंद गुणाजी, भारत गणेशपुरे, किशोर कदम, मोहन जोशी, विद्याधर जोशी, अरुण नलावडे, संजय खापरे, नागेश भोसले, विजय पाटकर, प्रिया बेर्डे, सुरेखा कुडची, उषा नाईक, नफिसा शेख, ढोले गुरुजी, भक्ती चव्हाण, सुरेश विश्वकर्मा आणि राधिका पाटील यांनी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

Related posts: