माणसांमध्ये रमणाऱया देवाची गोष्ट देवा शप्पथ

तो येतोय… आजच्या युगात… आजच्या रूपात’ असे आजच्या काळाशी धागा जोडणारे शब्द गेल्या काही दिवसांपासून झी युवा वाहिनीवरील एका प्रोमोतून कानावर पडताहेत. पौराणिक मालिकांच्या भाऊगर्दीत या शब्दांनीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि ‘देवा शप्पथ’ या मालिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली. देव आहे आणि देव नाही असे मानणारे दोन विचारप्रवाह नेहमीच आपल्याला आजूबाजूच्या माणसांमध्ये दिसतात. देव ही निरंकारी गोष्ट आहे असं एक मत आहे आणि दगडाला मूर्तीचा आकार देऊन त्यामध्ये देव पाहणारी एक दृष्टी आहे. यावर भाष्य करणारी ‘देवा शप्पथ’ ही मालिका सोमवारपासून झी युवावर सुरू होणार आहे.
आजच्या युगात जर देव या संकल्पनेशी मानवी मनातील भावना जोडायच्या झाल्या तर देव आणि माणसाची भेट कशी होईल? या भन्नाट फँटसीवर बेतलेली ‘देवा शप्पथ’ ही मालिका वेगळी ठरणार आहे. नास्तिकपणा हा केवळ एक भूमिका म्हणून स्वीकारलेली भावना नसते तर देव असण्याची विचारधारा त्यांना पटत नसते म्हणूनच ती स्वीकारलेली असते. आजच्या युगातील हाच विचार घेऊन ही मालिका छोटय़ा पडद्यावर येत आहे. झी युवा या वाहिनीवर 20 नोव्हेंबरपासून रात्री 9.30 वाजता अंधश्रद्धा आणि अतिश्रद्धा यात समन्वय साधायला आलेल्या ‘देवाची गोष्ट देवा शप्पथ’ या मालिकेतून पहायला मिळणार आहे. या मालिकेत देव म्हणजेच खटय़ाळ कृष्ण उर्फ आजचा क्रिशच्या भूमिकेत क्षितिश दाते आहे. त्याचबरोबर त्याचा नास्तिक भक्त श्लोकच्या भूमिकेत संकर्षण खराडे आहे. यांच्याबरोबरच विद्याधर जोशी, सीमा देशमुख, स्वानंद बर्वे, शाल्मली टोळये, अभिषेक कुलकर्णी, कौमुदी वालोकर, चैत्राली गुप्ते, आनंदा कारेकर आणि अतुल तोडणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
झी युवा आणि झी टॉकीजचे बिझनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितले की, झी युवा ही वाहिनी एक वेगळं आणि फ्रेश कन्टेन्ट देण्यासाठी आजच्या प्रेक्षकांमध्ये ओळखली जातेय. देवाशप्पथ ही एक पूर्णपणे वेगळी संकल्पना असून या मालिकेतून आम्ही देव आणि भक्ताचे सुंदर नाते दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. साताऱयाजवळच्या हरीपूरच्या कृष्णमंदिराचे पुजारी विश्वासराव दशपुत्रे अत्यंत श्रध्दाळू आणि जगातल्या सगळय़ांनाच केवळ त्याच देवभक्तिच्या तराजूत मोजणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि यांच्यापेक्षा पार अगदी वेगळय़ा टोकाला असलेलं दुसरं व्यक्तिमत्व म्हणजे श्लोक दशपुत्रे, विश्वासरावांचा धाकटा मुलगा आहे स्वकतफ&त्वावर विश्वास असलेला आणि कमालीचा नास्तिक. या दोन टोकाच्या विचारधारांमधील एक सुवर्णमध्य गाठायला देवालाच पफथ्वीवर यावं लागतं. कृष्णकांत उर्फ क्रिश या श्लोक दशपुत्रे याला क्रिश भेटायला आलाय. देव आहे नाही या विचारापुढे जाऊन, माणसाचं पफथ्वीवरील आयुष्य किंवा जगाचा राखला गेलेला समतोल कोणी एक निर्माणकर्ता असल्याशिवाय शक्य झालं असतं का? जर कोणी निर्माणकर्ता असेल आणि आपल्याला त्याची कल्पनाच नसेल तर जगातलं सगळय़ात महत्त्वाचं सत्य आपल्याला माहीत नाही असा याचा अर्थ होईल. त्यामुळेच जगाचा कोणी एक निर्माणकर्ता आहे या संकल्पनेसोबत पुढे जात, एक फ्रेश विचाराचा, मनाला विचार करायला लावणारी आणि त्याचबरोबर निखळ आनंद देणारी एक मालिका झी युवा आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. यात देव स्वत: माणसाची श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांचा कसा समन्वय घालतो हे पाहण्याची मजा प्रेक्षकांना एक वेगळीच अनुभूती देईल. देवाकडे पाहण्याचा एक वेगळा पण पारदर्शक दृष्टिकोन घडवणारी ही मालिका आहे.