|Friday, November 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मालती माने बालविद्यामंदिरमध्ये बालदिन उत्साहात

मालती माने बालविद्यामंदिरमध्ये बालदिन उत्साहात 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

      येथील मालती माने बालविद्यामंदिरमध्ये बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह माने यांच्या हस्ते पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

    यावेळी अध्यक्ष माने यांनी मनोगतात, मुलांना त्यांच्या गतीने व कलाने फुलू द्यावे, हेच खरे बालशिक्षण असल्याचे सांगितले. तसेच मुख्याध्यापक संजय रेंदाळकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रशालेत बालदिनामित्त चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. याचे परिक्षण अंजना शिंदे यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती पाटील यांनी केले. तर स्वागत जयश्री मांडवकर यांनी केले. याप्रसंगी कल्पना भिलुगडे, उज्वला शिसोदे, सारिका संकपाळ, केशव गुरव, राजू गवंडी उपस्थित होते.

 

Related posts: