|Sunday, August 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शिक्षण क्षेत्रासाठी बोहरांनी दिलेली देणगी लाखमोलाची- आम. हाळवणकर

शिक्षण क्षेत्रासाठी बोहरांनी दिलेली देणगी लाखमोलाची- आम. हाळवणकर 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

     सामाजिक उन्नती साधणाऱया शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रासाठी मदनलाल बोहरा यांनी दिलेली देणगी लाखमोलाची आहे. आजवर अनेक ज्ञानसंकुलांच्या इमारती बांधीत शेठजींनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. असे प्रतिपादन  आमदार सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केले.

      ना. बा. बालमंदिर व विद्यामंदिरच्या मदनलाल बोहरा बालवाडी व प्राथमिक विभाग या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रंसगी आमदार हाळवणकर बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मदनलाल बोहरा व हरिष बोहरा यांच्या कार्याचा गौरव केला. माजी वस्त्राsद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी मनोगतात, स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी गुणवत्ता वाढीशिवाय पर्याय नाहि हे ना. बा. ए. सोसायटीने सिध्द केले आहे. म्हणूनच स्पर्धात्मक युगात हे ज्ञानसंकुल टिकून आहे. असे सांगितले.

      तसेच कौशल्यपूर्ण शिक्षणास महत्त्व देणे ही काळाची गरज ओळखून या ज्ञानमंदिरातून एक सक्षम पिढी घडेल असा आशावाद शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी व्यक्त केला. आपल्या अध्यक्षीय मनोगतात नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी ना. बा. ए. सोसायटीच्या भावी कार्यास भुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सचिव बाबासाहेब वडिंगे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. सूत्रसंचालन प्रा. युवराज मोहिते यांनी केले. तर संस्थेचे चेअरमन हरिष बोहरा यांनी आभार मानले. याप्रसंगी अशोक स्वामी, नगरसेवक अजितमामा जाधव, राजगोपाल डाळय़ा, शशिकांत रानडे, सत्यनारायण ओझा, लक्ष्मीकांत पटेल, श्रीकांत चंगेडिया, प्राचार्य बी. ए. खोत, मुख्याध्यापिका एस. एस. गोंदकर, एस. ए. भगत यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

 

 

Related posts: