|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ‘तो’ मृतदेह इस्लामपूर शवागृहात

‘तो’ मृतदेह इस्लामपूर शवागृहात 

प्रतिनिधी/ शिराळा

शिरसी ता. शिराळा येथील चक्रीभैरव मंदिरातील ‘नरबळी कि खून’ या घटनेतील मयताच्या नातेवाईकांचा अद्याप पत्ता लागलेला नसून मृतदेह इस्लामपूर येथील शवागृहात ठेवण्यात आला असल्याची माहिती, शिराळा पोलिसांच्याकडून देण्यात आली आहे.

तालुक्यातील शिरसी, शिवरवाडी व पत शिराळा या तीन गावांच्या हद्दीवरती असणाऱया चक्रीभैरव मंदिरात शुक्रवार, 17 रोजीच्या रात्री ते शनिवार, 18 रोजीच्या पहाटे या दरम्यानच्या कालावधीत एका इसमाचा मृतदेह सापडून आला होता. या इसमाचा खून करण्यात आला आहे कि नरबळी या बाबतीत संभ्रम निर्माण झाला आहे. या घटनेचे नोंद शिराळा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून हा प्रकार खुनाचा असल्याचा निर्वाळा शिराळा पोलिसांकडून प्राथमिक चौकशी वरुन देण्यात आलेला आहे.

परंतु मृतदेहाच्या जवळच सापडलेल्या सुया खोवलेले लिंबू, नारळ, हळद-पुंकू, आदी साहित्यावरुन तसेच मृतदेह हा मूर्तीच्या समोरच दक्षिण-उत्तर अशा स्थितीत पडलेला असल्यामुळे तो खून नसून नरबळी असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. दरम्यानच्या काळात ही घटना घडली त्या दरम्यानचा कालावधी हा आमावस्येचा असल्याने हा नरबळीच असावा असे दाट अंदाज व चर्चा तालुक्यात सुरु आहे. या घटनेला धरुन प†िसरातील गावातून मात्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

घटना घडल्याच्या आजच्या तिसऱया दिवशीही याबाबतीत कोणताचा ठावठिकाणा लागलेला नाही. मृतदेह इस्लामपूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आलेला आहे. शिराळा पोलिसांकडून तासगाव, भिलवडी, पलूस आदीसह सांगली पोलीस ठाण्यात या मयताचे फोटो पाटविण्यात आलेले आहेत. यासह इतर बाबींची चौकशी यंत्रणा राबवून शिराळा पोलिसांकडून तपास सुरु आहे. यासंदर्भातील चौकशीची सूत्रे शिराळा पोलिसांकडून युद्ध पातळीवरती राबविण्यात येत असल्याची माहिती एपीआय स्वप्नील घोंगडे पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.

Related posts: