|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » डोंबिवलीत कंपनीमध्ये स्फोट , एक जखमी

डोंबिवलीत कंपनीमध्ये स्फोट , एक जखमी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

डोंबिवलीतील एमआयडीसीतल्या एका कंपनीत स्फोट झाला असून यात एका कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

आज सकाळी दहाच्या सुमारास एमआयडीसी फेज 2 मधल्या ऍल्यूफिन कंपनीत स्फोट झाला. कंपनीतल्या कम्प्रेसरमध्ये झालेल्या या स्फोटात एक कामगार गंभीर जखमी झाला. राजेंद्र जावळे असे या कामगाराचे नाव असून त्यांचा या स्फोटात पाय तुटला आहे. त्यांच्यावर एमआयडीसीतल्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान,डोंबिवली एमआयडीसी मागच्या वर्षभरातील ही तिसरी स्फोटाची घटना आहे. यापूर्वी गेल्या वर्षी एमआयडीसीतल्या प्रोबेस कंपनीत भीषण स्फोट झाला होता. तर याच वर्षी ऑगस्ट महिन्यात फेज22मधल्या इंडो अमाईक कंपनीतही स्फोट झाला होता.

 

Related posts: