|Thursday, December 13, 2018
You are here: Home » Top News » सुपाऱया दिल्या जात असताना सरकार झोपले आहे काय?

सुपाऱया दिल्या जात असताना सरकार झोपले आहे काय? 

पुणे / प्रतिनिधी  :

  न्यूड, एस. दुर्गा, दशक्रिया, पद्मावती आदी चित्रपटांच्या निमित्ताने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. चित्रपटांमधून सामाजिक परिस्थितीचे वास्तव चित्रण, रूढी-परंपरा आदी विषयांवर भाष्य करण्यात आले आहे. मात्र, या कलाकृतीबाबत आक्षेप घेतला जात आहे. चित्रपटांवर बंदी, आंदोलने यातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जात आहे, असे मत महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. कलाकारांना मारून टाकण्याच्या सुपाऱया दिल्या जात असताना सरकार झोपले आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 याबाबत पाटील म्हणाले, या चित्रपटाच्या निर्माते व दिगदर्शकांना अंनिसकडून बोलण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार असून, प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. नम्रतेने, विनयाने व्यक्त होण्याचे अंनिसने कायम स्वागत केले आहे. प्रश्न विचारणे, वाद-संवाद हे विकासाचे लक्षण आहे. मात्र, अशा पद्धतीने दडपशाही करून भारतीय परंपरेचा विचार संपवता येणार नाही. अभिव्यक्तीची गळचेपी न होता हे चित्रपट पहावेत म्हणून सरकारने याचा प्रचार केला पाहिजे. आमचा समांतर सेस्नॉरशीपला विरोध आहे.

 

Related posts: