|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » पुणे » पर्यावरणजागृतीद्वारे इंदिरा गांधींना अभिवादन

पर्यावरणजागृतीद्वारे इंदिरा गांधींना अभिवादन 

पिंपरी/ प्रतिनिधी :

पिंपरी-चिंचवड काँग्रेसच्या पर्यावरण विभागाच्या वतीने भोसरी औद्योगिक परिसरात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी जयंतीनिमित्त पर्यावरण जागृतीविषयक उपक्रम राबविण्यात आले.

इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे व ज्येष्ठ नेत्या निगारताई बारस्कर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते अशोक काळभोर, विभागाचे उपाध्यक्ष दिलीप मोहिते, उमेश बनसोडे, हर्षदा चांदुरे आदी उपस्थित होते. या वेळी राष्ट्रीय एकात्मतेबरोबरच पर्यावरणाची हानी टाळण्यसाठी प्लॅस्टिक बाटली न वापरण्याची शपथही घेण्यात आली. पर्यावरणजागृतीसाठी वृक्षारोपणासोबतच रोपांचेही या वेळी वाटप करण्यात आले. आयुवीर मंगल या 4 वर्षीय मुलाच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. अशोक मंगल, नाना रणदिवे, श्वेता मंगल, रवींद्र आगरवाल, राजेश नायर, आयुष मंगल व अन्य कार्यकर्त्यांनीही या वेळी हजेरी लावली.

Related posts: