|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » काँग्रेसनेही अधिवेशन अनेकदा लांबणीवर टाकले ; जेटलींचा पलटवार

काँग्रेसनेही अधिवेशन अनेकदा लांबणीवर टाकले ; जेटलींचा पलटवार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

“सध्याच्या विरोधी पक्षाने (काँग्रेस) 2011 मध्ये संसदेचे अधिवेशन लांबणीवर टाकले होते. तसेच यापूर्वीही असे अनेकदा झाले. त्यामुळे ही परंपरा चालत आली आहे,” अशा शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसवर पलटवार केला.

विरोधकांचा सामना करण्याची पंतप्रधान मोदींमध्ये हिंमत नसल्याने ते अधिवेशन लांबणीवर टाकत आहेत, असा आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला होता. या आरोपाला जेटलींनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, निवडणूक कार्यक्रम लक्षात घेऊन आजपर्यंत अनेकदा संसदेच्या अधिवेशनाची वेळ बदलण्यात आली. काँग्रेसनेही यापूर्वी अनेकवेळा अधिवेशनाच्या वेळा बदलल्या आहेत.

तसेच ते पुढे म्हणाले, गेल्या 10 वर्षातील केंद्रातील सरकार सर्वात भ्रष्ट सरकार होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या तीन वर्षात सर्वात प्रामाणिक आणि भ्रष्टाचारविरहित सरकार दिले. खोटे कितीही दरडावून सांगितले तरी ते खरे होत नाही.