|Saturday, January 19, 2019
You are here: Home » Top News » परदेशात जाण्यासाठी कार्ती चिदंबरम यांना सशर्त परवानगी

परदेशात जाण्यासाठी कार्ती चिदंबरम यांना सशर्त परवानगी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचे पूत्र कार्ती चिदंबरम यांना परदेशात जाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. कार्ती यांच्या मुलीला लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घ्यायचा असल्याने तिच्यासोबत जाण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली.

कार्ती चिदंबरम यांच्यावर आर्थिक घोटाळ्यांचे आरोप आहेत. त्यामुळे त्यांना परदेशात जाण्यास बंदी घालण्यात यावी, अशी विनंती केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सर्वोच्च न्यायालयात केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना आज सशर्त परवानगी दिली आहे. त्यानुसार, कार्ती चिदंबरम २ डिसेंबरला लंडनला जाणार आहेत. मात्र, १० डिसेंबरपर्यंत त्यांना भारतात परतण्याचे बंधनही घालण्यात आले आहे. जर ते १० डिसेंबरपर्यंत भारतात परतले नाही तर त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी परवानगी देताना स्पष्ट केले. तसेच परदेशात जाण्यासाठी परवानगी देताना न्यायालयाने कार्ती यांच्याकडून तसे प्रतिज्ञापत्रही लिहून घेतले असल्याची माहिती मिळत आहे.

Related posts: