|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » उद्योग » मुंबई, बेंगळूर, दिल्ली गुंतवणुकीस योग्य

मुंबई, बेंगळूर, दिल्ली गुंतवणुकीस योग्य 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आशिया पॅसिफिक क्षेत्रात भारतातील स्थावर मालमत्ता क्षेत्रातील गुंतवणूक वाढत आहे. स्थावर क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी सरकारकडून राबविण्यात आलेल्या धोरणास विदेशी गुंतवणूकदारांकडून पसंती मिळाली आहे. प्राईसवॉटरहाऊसकुपर्स आणि द अर्बन लँड इन्स्टिटय़ुट यांच्या संयुक्त विद्यमाने जाहीर करण्यात आलेल्या ‘द इर्मर्जिंग ट्रेन्ड्स इन रिअल इस्टेट एशिया पॅसिफिक 2018’ या अहवालात मुंबई 12 व्या, बेंगळूर 15 व्या आणि 20 व्या स्थानी दिल्ली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थावर मालमत्तेस गुंतवणुकीसाठी सिडनी, मेलबर्न, सिंगापूर, शांघाय आणि हो चि मिन्ह सिटी सर्वोत्तम ठरली आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱया मुंबईत गेल्या काही वर्षात स्थावर मालमत्तेच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील अनेक कंपन्या येथे कार्यरत आहेत. सध्या स्थावर मालमत्तेत विदेशी गुंतवणूक वाढत आहे. मुंबईतील कार्यालय रिक्त दरात घसरण होत असली तरी किंमत अजूनही उच्च आहे.

बेंगळूर शहर हे बीपीओंसाठी उभारत आहे. आयटी क्षेत्रात नाव कमविल्यानंतर विदेशी कंपन्या आपल्या आऊट सोर्सिंगसाठी कार्यालये उभारत आहेत. विदेशी गुंतवणूकदारांनी स्थानिक गुंतवणूकदारांच्या मदतीने येथील बिझनेस पार्कमधील संपत्ती खरेदी केली. आता त्या संपत्तीचा विक्री करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या येथील बीपीओ क्षेत्राचा वार्षिक 8 ते 9 टक्क्यांनी वाढ होत आहे. यांत्रिकीकरण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र उभारण्यासाठी अनेक कंपन्या येथे गुंतवणूक करत आहेत.

अन्य भारतीय शहरांच्या तुलनेत नवी दिल्लीची कामगिरी समाधानकारक नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे येथील सर्वाधिक भागावर वस्ती आहे, मात्र सध्या हे प्रमाण घटत आहे. दिल्लीतील जागेची किंमत अन्य शहरांच्या तुलनेने अधिक आहे. दिल्लीत प्रकल्प उभारताना विलंब होतो आणि अनेक विकासकांच्या कामाचा दर्जा उत्कृष्ठ नाही.

Related posts: