|Friday, October 19, 2018
You are here: Home » Top News » पुण्यातील पीएमपीएमएलचे कंत्राटी बसचालक संपावर

पुण्यातील पीएमपीएमएलचे कंत्राटी बसचालक संपावर 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुणे महानगर परिवहन महामंटळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल)कंत्राटी चालकांनी अचानक संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे पीएमपीएमएलचे संचालक तुकाराम मुंढे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, ज्या खासगी कंपनीद्वारे कंत्राटी चालक पुरवले जातात,त्या प्रसन्न पर्पल कंपनीसोबात कारारच तुकाराम मुंढेंनी रद्द करण्याचे ठरवले आहे.

प्रसन्न पर्पल आणि पीएमपीएमएलमध्ये करार झाला आहे. त्यानुसार चालकांचा पगार आणि बसेसची देखभाल करण्याची जबाबदारी प्रसन्न पर्पल कंपनीची आहे. मात्र,कंपनी करार पाळत नसल्यामुळे मुंढेंनी मागच्या दोन महिन्यांपासून चालकांचे पगार रोखून धरले आहेत. त्यामुळे आज सकाळपासून पीएमपीएमएलचे चालक संपावर गेले आहेत.

Related posts: