|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » भविष्य » राशी- भविष्य

राशी- भविष्य 

मेष-

सुवर्णालंकारानी खरेदी कराल, विद्येचे अपेक्षे प्रमाणे यश, मानसिक सुख, उत्तम राहील. नवीन नोकरी मिळेल. श्रीमंतीत भर पडेल. भावंडाची मदत मिळवून कार्यात यश, शिक्षणासाठी परदेश दौरा. पण कळत नकळत घडलेल्या काही चुकांमुळ प्रत्येक कामात विरोध जाणवेल. त्यासाठी सावध राहून कामे केल्यास चांगले. या आठवडय़ात लोकांच्या बोलण्यावर बारीक लक्ष ठेवा. बरीच माहिती मिळेल.


वृषभ-

जे काही घडले ते आपल्या कर्मामुळे हा मुलमंत्र लक्षात ठेवा. शिक्षणात मध्यम यश, एकाद्या व्यक्तिकडून सल्ला मिळाल्यास त्यास तुमच्या भाग्योदयास सुरुवात असू शकते. वाहन अपघात, चोरी, खोटे आरोप येणे, नको त्या मार्गाकडे मन वळणे, आरोग्यात बिघाड असे प्रसंग आल्यास त्याची कारणमिमांसा शोधून त्यावर मार्ग काढा.


मिथून-

सर्व कामात यश मिळेल. स्वतःची जागा होण्याचे योग. अनपेक्षित धनलाभ, निवडणुकीत यश, दानधर्मात वेळ जाईल, व्यवसायात मोठे लाभ होतील, पण मानहानी, आरोग्य बिघडणे, ताप, वगेरेपासून जपावे. सरकारी कामे आपोआप होतील. एखाद्या मोठय़ा कामात मित्रांचे सहकार्य लाभेल. नवे घर बांधाल. संगीतात यश मिळेल. कुटुंबात मंगल कार्ये होतील.


कर्क-

नोकरी व्यवसायानिमित्त प्रवास केल्यास मोठा पैसा मिळेल. कुणाला तरी मदत करायला जाल तर नको त्या प्रकरणात अडकाल. शेती हातातून जाणे, सरकारी कृपा लाभेल, कुटुंबात कल्याण होईल, लक्ष्मीची पसन्नता मिळेल, गेलेली इस्टेट परत मिळेल, गाडय़ा खरेदी कराल, मुके प्राणी हरवणे व बाधिक पिडेचा त्रास होईल. शस्त्रामुळे इजा, गोळीबार, दगडफेक यापासून जपावे. 


सिंह-

एwश्वर्य प्राप्त होईल. तिर्थक्षेत्री प्रवास होतील, नव्या नोकरीच्या शोधात असाल तर यश मिळेल पण जागेसंदर्भात घोटाळे साधतील, पोलीस केसीस, शत्रुत्त्व यामुळे मनस्ताप पण तुमची बाजू खरी असेल तर यश मिळवाल. आरोग्य सुधारेल. रद्द झोलेला विवाह पुन्हा जुळण्याची शक्मयता. वाहन खरेदी कराल, मध्यस्थीमुळे अकस्मात कलह, कामातील चुकामुळे त्रास होण्याची शक्मयता.


कन्या-

नोकरी व्यवसायासाठी चालू असलेल्या मुलाखतीत यश मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. जागा खरेदी कराल. मुलाबाळांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. अघोरी प्रकार, करणीबाधा यापासून दूर रहा. प्रवासात अडचणी वाहनात बिघाड असे प्रकार घडतील. अनोळखी लोकांकडून लिफ्ट घेऊ नका अथवा देऊ नका. पिकनिक अथवा नवख्या ठिकाणी जाताना किंमती वस्तूची काळजी घ्यावी. प्रमाणाबाहेर खर्च होणार नाही याकडे लक्ष द्यावे लागेल.


तुळ-

नव्या कल्पना वापरल्यास उद्योग व्यवसायात चांगले यश मिळेल. आवश्यकता नसेल तर मोठे प्रवास टाळावेत व्यवहार पूर्ण नवीन असतील तर अनोळखी व्यक्तीला पूर्ण पारखल्याशिवाय महत्त्वाचे कोणतेही व्यवहार करू नका. काळजी घ्यावी मोठी गुंतवणूक करताना त्याचे फायदे तोटे तपासून घ्या. घाईगडबड नको. लग्न समारंभ व तत्सम ठिकाणी जाण्याचा प्रसंग आल्यास घाई गडबडीत किमती वस्तू विसरण्याची शक्मयता आहे.


वृश्चिक-

महत्त्वाच्या कामानिमित्त दूरवरचे प्रवास होण्याची शक्मयता. पूर्वीचे आर्थिक व्यवहार खोळंबले असतील तर ते पूर्ण होतील, पण प्रयत्नांची पराकाष्टा ही आवश्यक. जागा अथवा जमीन व्यवहार करताना काळजी घ्यावी. भागीदारीत व्यवसाय करणार असाल तर कायदेशीर चौकटीत राहूनच करा नवख्या ठिकाणी अथवा देवस्थानला गेल्यास तिथे नियमभंग करू नका.


धनु-

मुळ नक्षत्रातील शनीमुळे कोणत्याही बाबतीत बेफिकीरपणा अंगलट येईल. सावध राहा. आजार वगैरे आल्यास औषधोपचार दुर्लक्ष करू नका. या सप्ताहात काही लाभाच्या संधी आल्यास त्या फायदेशीर ठरतील. नको त्या प्रकारामागे लागून घातकी वस्तू घरी आणू नका. बाहेरील बाधेचा परिणाम होऊ शकेल. आार्थिकदृष्टय़ा हा आठवडा चांगला जाईल.


मकर-

नोकरी, आरोग्य, शिक्षण, मुलाबाळांचे सौख्य व धनलाभ याबाबतीत अनुकूल वातावरण राहील. जे काम हात घ्याल ते यशस्वी कराल. यश देणारा अठवडा आहे. दूरवरचे प्रवास होण्याचे योग. घरातील का वस्तूची अदलाबदल करा. अडगळ काढा त्यामुळे अडलेल्या कामांना गती मिळेल. काही जुन्या मित्रांची गाठभेट होईल.


कुंभ-

वास्तू दोष व प्रखर बाधा निर्माण करणारे अनिष्ट ग्रहमान आहे. घरात बाहेरील कोणतीही जुनी वस्तू आणताना त्याच्याबरोबर अनिष्ट शक्ती येणार नाही याची काळजी घ्या. आर्थिकदृष्टय़ा चांगले योग आहेत एखादे मोठे घबाड हात लागण्याची शक्मयता आहे.


मीन-

काहीतरी करून दाखविण्याचे जिद्द असेल तरच जीवनात यशस्वी होतो. यासप्ताहात तशा संधी मिळतील. कामाची आवड निर्माण होईल. संगीत, गायन, वादन, चित्रपट क्षेत्र यात मोठे येश मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. पैसा अडका मानसन्मान, वाहन, घरदार या सर्व बाबतीत यशस्वी ठराल, पण कामे रेंगाळत ठेवू नका.

Related posts: