|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » नववर्षारंभी घरोघरी पाईपद्वारे गॅस पुरवठा!

नववर्षारंभी घरोघरी पाईपद्वारे गॅस पुरवठा! 

1 जानेवारीपासून सुरुवात,

पहिल्या दिवशी 50 जणांना जोडण्या,

इंधन खर्चात किमान 20 टक्के बचत

प्रतिनिधी /रत्नागिरी

रत्नागिरी शहरात नववर्षाच्या प्रारंभापासून पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्याच्या योजनेला सुरुवात होत आहे. 1 जानेवारी रोजी या योजनेचे उद्घाटन करताना 50 घरांमध्ये गॅस जोडणी देण्यात येणार आहे. पाईपलाईनद्वारे पुरविण्यात येणारा हा गॅस घरगुती सिलींडरपेक्षा सुमारे 20 टक्के स्वस्त असून त्याचा पुरवठा अखंडीत होणार असल्याने ही योजना लोकप्रिय होईल, असा विश्वास युनीसन एनव्हायरो प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख अधिकारी विनोद पापळ यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरांमध्ये सिलेंडरमुक्त गॅस आणि ग्रामीण भागात लाकुडमुक्त इंधन असे धोरण स्वीकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हय़ात शहरी भागात पाईपद्वारे गॅस पुरवठा तर ग्रामीण भागात प्रत्येक घरी गॅस सिलेंडर देण्याचे धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सहकार्याने 1 जानेवारी 2018 पासून ही योजना कार्यान्वीत होणार असल्याची माहिती पापळ यांनी दिली.

रत्नागिरी शहर परिसराबरोबर चिपळूण, देवरूख, सावर्डे, संगमेश्वर, गणपतीपुळे, गुहागर याठिकाणी पहिल्या टप्प्यात घरगुती वापराचा गॅस पाईपद्वारे पुरवण्याची योजना आह़े त्यासाठी ऑक्टोबर 2017 मध्ये जमिनीखालील वायु वाहिनी घालण्याचे काम सुरू झाले आहे. हे काम मार्च 2018 मध्ये पूर्ण होईल़ त्यानंतर मागणीप्रमाणे ग्राहकांना जोडणी देण्यात येईल.

एमआयडीसीत मागणीप्रमाणे पुरवठा

पाईपद्वारे वायु पुरवठा हा पर्यावरण पूरक असून तो सतत उपलब्ध असत़ो सिलेंडर संपण्याची कटकट नाह़ी तो वापरकर्त्याला मैत्रीपूर्ण उपयोगाची जाणीव देत असतो. रत्नागिरी जिह्यातील लोटे-पर्शुराम, रत्नागिरी व देवरूख येथील औद्योगिक वसाहतींमध्ये मागणीप्रमाणे जोडणी देण्यात येईल़

रत्नागिरी परिसरात 10 हजार, चिपळुणात 8 हजार, देवरूखात 600, खेड-लोटे 100, सावर्डेत 600, गणपतीपुळेत 400 एवढय़ा घरगुती वापराच्या वायुजोडण्या देण्याचे उद्दिष्ट आह़े या करिता 500 ऱू फॉर्म फी, 1000 रू. नोंदणी व जोडणी, 5000 हजार ऱू अनामत (परतावा पात्र) शुल्क ठेवण्यात येणार आह़े सध्याच्या सिलेंडरद्वारे मिळणाऱया गॅसपेक्षा हा गॅस 20 टक्के एवढा स्वस्त राहणार आह़े, असे त्यांनी सांगितल़े रत्नागिरी शहरासोबत कुवारबाव, शिरगाव, कारवांचीवाडीपर्यंत त्याचा विस्तार करण्यात येणार आह़े. रत्नागिरी जिह्यात 20 हजार जोडण्या देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असल्याचे पापळ यांनी सांगितले.

दुसऱया टप्प्यात दापोली, मंडणगड, राजापूर, लांजा या शहरांमध्ये पाईपद्वारे वायू जोडणी देण्याकरिता 2018 मध्ये काम करण्यात येणार आहे. यामुळे जिह्यातील सर्व शहरात पाईपद्वारे गॅस मिळेल़ यामुळे ग्रामीण भागात सिलेंडर जोडणीचा विस्तार वाढवणे सरकारला शक्य होईल़

डिसेंबरअखेर गाडय़ांसाठी सीएनजी

डिसेंबर 2017 पर्यंत गाडय़ांसाठी सीएनजी उपलब्ध करून देण्यात येईल़ त्यासाठी रत्नागिरी शहर, जेके फाईल्स परिसर, रेल्वे स्टेशन परिसर येथे वितरण केंद्र ठेवण्यात येणार आह़े चिपळूणात 2 तर देवरूख, सावर्डे, गणपतीपुळे, गुहागर, लोटे या ठिकाणी गाडय़ांसाठी प्रत्येकी 1 सेएनजी केंद्र सुरू करण्यात येणार आहे रत्नागिरी जिह्यात 15 हजार ऑटो रिक्षा पेट्रोलवर सुरू आहेत़

रत्नागिरीतील पाईपलाईनचे काम सुरु करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडे अधिकृत प्रस्ताव दाखल झाला आहे. पाण्याच्या पाईपलाईनप्रमाणे गॅस वाहिनीसाठी सरकारी दराने होणारे शुल्क भरण्यास आम्ही तयार आहोत. हे काम जनहिताचे असून ते लवकरात लवकर व्हावे म्हणून आपला पूर्ण पाठिंबा राहिल, अशी ग्वाही आमदार उदय सामंत आणि नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी आपल्याला दिल्याचे पापळ यांनी सांगितले.

Related posts: