|Friday, November 16, 2018
You are here: Home » उद्योग » इंटरनेटमध्ये मक्तेदारी नाही : तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद

इंटरनेटमध्ये मक्तेदारी नाही : तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इंटरनेट क्षेत्रामध्ये कोणाचीही मक्तेदारी निर्माण होणार नाही याची सरकारकडून दखल घेण्यात येत आहे. याव्यतिरिक्त इंटरनेटवर अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

इंटरनेटचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. डिजिटल स्वातंत्र्य कायम राहण्यासाठी सरकारकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. गेल्या दोन वर्षात इंटरनेट सेवेच्या किमतीवर कोणाचीही मक्तेदारी निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. यामध्ये फेसबुकच्या फ्री बेसिक्स व एअरटेल झिरोचाही समावेश आहे. मात्र काही कंपन्यांनी मोफत इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी जनतेचा पाठिंबा घेतला आहे. ऍपलकडून भारतात उत्पादन घेण्यासाठी सरकारबरोबर बोलणी करत आहे, असे रविशंकर यांनी म्हटले. 

कंपनीकडून करात सवलत मागविण्यात आली असून ती अगोदरच फेटाळण्यात आली आहे. अर्थ, माहिती तंत्रज्ञान आणि औद्योगिक धोरण मंत्रालय यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे, असे त्यांनी म्हटले.

Related posts: