|Sunday, July 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » म्हसवडमध्ये मंगला बनसोडेंचा सत्कार

म्हसवडमध्ये मंगला बनसोडेंचा सत्कार 

प्रतिनिधी/म्हसवड

प्रख्यात तमाशा कलावंत राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांना नुकताच ‘राष्ट्रीय कलावंत पुरस्कार’ मिळाला आहे, या अनुशंगाने प्रेक्षक प्रतिनिधी यांच्या वतीने त्यांचा म्हसवड येथे सत्कार करण्यात आला.

  सिध्दनाथ रथोत्सवानिमित्त कार्यक्रमात भाजपाचे सातारा जिल्हा शिक्षक आघाडीचे अध्यक्ष प्रा. विश्वंभर बाबर, माजी नगरसेवक बाळासाहेब राजेमाने, वकील संघाचे ऍड. निसार काझी यांच्यातर्फे लोककला जतन करण्यासाठी सलग  पाच  पिढय़ा वाहून घेतलेल्या व नुकताच राष्ट्रीय स्तरावरील मानाचा राष्ट्रपती पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या मंगला बनसोडे व नितीन बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला.

आमच्यासाठी  ‘कला’  हेच  जीवन असून रसिक प्रेक्षक हीच आमची ‘संपत्ती’ असल्याचे राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांनी स्पष्ट केले. तसेच लोककला जिवंत ठेवून जतन करण्यासाठी मायबाप  प्रेक्षकांनी यापुढे सहकार्य  करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Related posts: