|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » एक देश, एक अभ्यासक्रम ही काळाची गरज

एक देश, एक अभ्यासक्रम ही काळाची गरज 

विधानपरिषदेचे सभापती डी. एस. शंकरमूर्ती यांचे उद्गार

बेळगाव / प्रतिनिधी

राष्ट्राच्या निर्मितीमध्ये शिक्षणाची भूमिका ही महत्वाची असते. ज्याप्रकारे एक देश एक कर प्रणाली जीएसटीच्या माध्यमातून राबविण्यात आली. त्याच धर्तीवर देशात एकच अभ्यासक्रम व वेतन प्रणाली राबविल्यास शिक्षणातील चढ उत्तार कमी होण्यास मदत होणार आहे. बदल हे लगेचच न होता. ते टप्प्या टप्प्याने होत असतात. त्यासाठी शिक्षकांनी प्रथम पुढाकार घ्यावा असे उद्गार विधानपरिषदेचे सभापती डी. एस. शंकरमूर्ती यांनी काढले.

कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघ, बेळगाव तर्फे मंगळवारी मराठा मंडळ संस्थेच्या सभागृहात ‘एक देश, एक शिक्षण पद्धती, एक वेतन’ या विषयावर आयोजित गोलमेज परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी माजी शिक्षण मंत्री विश्वेश्वर हेगडे – कागेरी, विधानपरिषद सदस्या तारा अनुराधा, अरूण शहापूर, शिवानंद चंदरगी, मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा राजश्री हलगेकर उपस्थित होत्या.

प्रारंभी शिवानंद यांनी शिक्षकांनी आपल्या ज्ञानात भर घालावी. जेणेकरून त्यांच्या हातून घडणारी पीढी ही सर्वज्ञानी असेल असे म्हणत त्यांनी शिक्षकांचेच कान टोचले. राजेश्री हलगेकर यांनी अरूण शहापूर यांच्या कामाचे कौतुक करून आज एचएससी, सीबीएसई, आयसीएसई यासारखे 6 विविध बोर्ड कार्यरत असून, प्रत्येकाची शिक्षण पद्धती वेगळी असल्याने विद्यार्थ्यांबरोबरच पालकही गोंधळत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिक्षकांना शाळेव्यतिरीक्त इतर कामांमध्ये गुंतविल्यानेच शिक्षणाचा दर्जा ढासळत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील यांनी प्रास्ताविक केले. विश्वेश्वर हेगडे-कागेरी व तारा अनुराधा यांनी हा विचार उत्तम असल्याचे सांगितले. या चर्चेत प्राध्यापक विनोद गायकवाड, एस. के. हुक्केरी, अनंत लाड, स्मिता सुरेबानकर, भास्कर देशपांडे, अरूणा नाईक यासह इतर शिक्षकांनी आपापल्या समस्या उपस्थितांसमोर मांडल्या.

Related posts: