|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वादग्रस्त पद्मावती चित्रपटावर बंदी घाला

वादग्रस्त पद्मावती चित्रपटावर बंदी घाला 

प्रतिनिधी / बेळगाव

वाद्ग्रस्त पद्मावती चित्रपटावर बंदी घालावी व त्याचे प्रदर्शन होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा आशयाचे निवेदन रजपूत समाजाने जिल्हाधिकाऱयांना दिले. मंगळवारी सकाळी समाजाच्या पदाधिकाऱयांनी हे निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, सदर चित्रपटामुळे दोन धर्मामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्याने समाज स्वास्थ्याला निर्माण होवू शकतो. जोपर्यंत सेन्सॉर मंडळ या चित्रपटाला हिरवा कंदील दाखवत नाहीत तोपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित केला जावू नये. त्याचप्रमाणे त्याच्या जाहिरातीही प्रसारित करु नयेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

समाजाचे अध्यक्ष अभयसिंह रजपूत, अर्जुनसिंग रजपूत, राजस्थानी रजपूत समाजातील पदाधिकारी व समस्त रजपूत समाज व महिला मंडळाच्या सदस्यांतर्फे हे निवेदन देण्यात आले..

Related posts: