ठाण्यात प्रसुतीसाठी जानवराच्या औषधांचा वापर

ऑनलाईन टीम / ठाणे :
जानवरांच्या औषधांवरील लेबल बदलून ती रूग्णांना विकत असल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. ठाण्यातील आधार रूग्णालयात 19 सष्टेंबर रोजी प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेसाठी या औषधाची विक्री झाल्याची माहिती आहे.
याप्रकरणी लाईफकेअर मेडिकोचे भागीदार रवींद्र शिरोळे,फार्मासिस्ट ललिता झिंझाड आणि औषध वितरक कंपीन मेसिने रेमिडीज इंडिया यांच्याविरोधात नौपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱयांनी 24 ऑक्टोबर ‘लाईफकेअर मेडिको’त तपासणी केली.त्यात 82 औषधांवर चुकीचे लेबलवर जानवरांच्या वापरासाठी हे औषध असून ते रूग्णांसाठी वापरता येणार नाही,असा स्पष्ट उल्लेख करण्यात आल्याचे दिसून आले.ठाण्यातील विविध औषध वितरकांकडून जवळपास अशा प्रकारची 3 हजार औषधे जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त गिरीश हुकरे यांनी दिली.