|Thursday, June 27, 2019
You are here: Home » leadingnews » कोपर्डी प्रकरणी गुन्हेगारांचा 29 नोव्हेंबरला फैसला

कोपर्डी प्रकरणी गुन्हेगारांचा 29 नोव्हेंबरला फैसला 

ऑनलाईन टीम / अहमदनगर :

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोपर्डी बलत्कार व हत्या प्रकरणी दोषींना शिक्षा ठोठवण्यासाठी 29 नोव्हेंबरला फैसला होणार आहे. कमी शिक्षा दिल्यास सामाजात चुकीचा संदेश जाईल  तीघांना फाशीच द्या ,अशी मागणी सरकारी वकील उज्वल निकम यांनी युक्तिवादामध्ये केली.

अहमनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 13 जुलै 2016 रोजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली होती.याप्रकरणी जितेंद्र शिंदे,संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती.या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. राज्यभरात काढण्यात आलेल्या मराठा मूक क्रांती मोर्चावेळी कोपर्डी प्रकारणातील दोषींना फाशी देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी लावून धरली, तसेच पीडीतेच्या आईकडूनही फाशीची मागणी करण्यात आली. त्यानंतर 18 नोव्हेंबरला अहमदनगर सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत आरेपींना दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर आज न्यायालयाने या तिन्ही आरोपींचा शिक्षेची सुनावणी 29 नोव्हेंबरला होणार असल्याचे सांगितले . आज कोर्टात झालेलया युक्तिवादात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा योग्य असल्याचे सांगितले. त्यामुळे आता 29 नोव्हेंबरला काय शिक्षा होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.