|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » Top News »  शेकोटीत पडून 11 दिवसांचा मुलगा गंभीर जखमी

 शेकोटीत पडून 11 दिवसांचा मुलगा गंभीर जखमी 

पुणे / प्रतिनिधी  :

पुण्यातील कोंढवा येथील एका कुटुंबात नुकत्याच जन्मलेल्या बाळास राहत्या घरात शेक देत असताना, तोल जाऊन ते बाळ शेकोटीत पडल्याची घटना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत बाळ 85 टक्के भाजले असून, उपचाराकरिता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कोंढव्यातील भाग्योदय नगर येथील सुमित्रा अपार्टमेंटमध्ये मोहमंद सगीर शेख यांचे कुटुंबीय राहते. बुधवारी सकाळी त्यांच्या नवजात बालकास आई घमेल्यात कोळशाचा विस्तव टाकून शेक देत होती. त्यानंतर ती मुलास पलंगावर सोडून दुसऱया खोलीत उर्वरित कामे करण्याकरिता गेली. त्याचवेळी तोल जाऊन चिमुरडा शेकोटीच्या घमेल्यात पडला.  घमेल्यातील विस्तवामुळे शेजारी असणाऱया पुठ्ठय़ालाही आग लागली आणि या पुठ्ठयावर जाऊन बाळ गंभीररित्या भाजले. यामध्ये बाळाला गंभीर इजा झाली असून, त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आलेले आहे. बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली आहे.

 

Related posts: