|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » साऊंड सिस्टीम अन् नाच प्रकरणी शिवाजी कॉलेजची चौकशी सुरु

साऊंड सिस्टीम अन् नाच प्रकरणी शिवाजी कॉलेजची चौकशी सुरु 

प्रतिनिधी/ सातारा

नॅक मानांकन मिळाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी महाविद्यालय प्रशासन आणि विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या परिसरात डी.जे. साऊंड सिस्टीम लावून जो नाच केला. त्याचे वृत्त तरुण भारतने प्रसिद्ध केले होते. सातारा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण सारंगकर यांनी महाविद्यालयीन प्रशासनाला चौकशीकामी पोलीस ठाण्यात बोलवून कोणीही फिरकले नाही. महाविद्यालयाने चक्क पोलिसांच्या हाती धतुराच दिला आहे. धर्मवीर युवा मंचने मुलांवर चुकीचे संस्कार महाविद्यालय प्रशासन करत असल्याने महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सचिव भाऊसाहेब कराळे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

सातारा शहरात रयत शिक्षण संस्थेचे पहिले महाविद्यालय म्हणून छत्रपती शिवाजी महाविद्यालय आहे. याच महाविद्यालयात नगर येथून आलेले प्राचार्य यांनी कर्मवीर अण्णांच्या मुल्यांना कसा हरताळ फासता येईल याचेच सुत्र अंगीकारत कार्यवाही सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी नॅक मानांकन मिळाले म्हणून चक्क विद्यार्थ्यांना डी.जे. ही साऊंड सिस्टिम लावण्यास परवानगी दिली आणि महाविद्यालयाच्या प्रांगणात वेडावाकडा नाचही करण्यास मुक अनुमती दिली. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनीही यथेच्छ आनंद लुटला. मात्र याची खबर घेत तरुण भारतने आवाज उठवला. त्या घटनेचे सचित्र वृत्त मंगळवारी प्रसिद्ध केले. सातारा शहर पोलिसांना पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी चांगलेच फैलावर घेतले. सातारा शहरात डी. जे. साऊंड सिस्टिमला बंदी असताना महाविद्यालयाच्या प्रांगणात वाजलीच कशी, चौकशी करुन संबंधित महाविद्यालय प्रशासनावर कारवाई करा, अशा सुचना दिल्याचे समजते. त्यावरुन सातारा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायण सारंगकर यांनी लगेच तसा सांगावाही महाविद्यालयाच्या प्रशासनाला धाडला. पोलिसांनी डी.जे.बाबतचे सगळे पुरावेही गोळा केले आहेत. जे विद्यार्थी व शिक्षक पुढे होते. त्यांनाही चौकशीसाठी बोलवले गेले आहे. परंतु आम्ही ‘रयत’चे आमचे कोणीही काही करु शकत नाही, याच आर्विभावात महाविद्यालयीन प्रशासनाने चक्क पोलिसांच्या हाती धतुरा दिला आहे. त्यामुळे पोलिसांकडून दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

रयतच्या सचिवांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा

महाविद्यालये ही संस्काराची शिदोरी असतात. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार घडवतात. कर्मवीर अण्णांनी तोच उद्दात हेतू डोळय़ासमोर ठेवून जे महाविद्यालय सुरु केले. त्याच महाविद्यालयात सध्याची समिकरणे वेगळी घडू लागली आहेत. त्यामुळे जेथे संस्काराची पायमल्ली होत आहे. अशा महाविद्यालयाची प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे यांच्यावर फौजदारी गुन्हा पोलिसांनी सुमोटो दाखल करण्यात यावा, तो न झाल्यास धर्मवीर युवा मंच जनआंदोलन उभे करेल, असा इशारा धर्मवीर युवा मंचचे अध्यक्ष प्रशांत नलावडे यांनी दिला आहे.

कारवाई ही झालीच पाहिजे

जो प्रकार रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात झाला. तो चुकीचाच होता. त्याला महाविद्यालयीन प्रशासन जबाबदार आहे. हिंदू धर्माचे शिक्षण देणारे काही कार्यक्रम घ्यायला परवानगी मागितली तर त्या परवानग्या महाविद्यालय कसे नाकारते आणि विद्यार्थ्यांकडून वर्गणी गोळा करुन त्यांच्याच पैशावर डी.जे. लावून नाच घडवून आणला जातो. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा युवा सेनेच्या माध्यमातून आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा युवा सेनेचे जिल्हा प्रमुख रणजितसिंह देशमुख यांनी दिला आहे.

Related posts: