|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » Top News » राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गाढव आल्यास तो माणूस म्हणून बाहेर येईल ; एकनाथ खडसे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गाढव आल्यास तो माणूस म्हणून बाहेर येईल ; एकनाथ खडसे 

ऑनलाईन टीम / भूसावळ :

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात एखादा गाढव जरी आला तरी तो माणूस म्हणून बाहेर पडतो,असे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे म्हणाले आहेत. भुसावळमध्ये बुधवारी संत ज्ञाानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूराव मांडे यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात खडसे बोलत होते.

या सोहळय़ात एकनाथ खडसे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच भय्याजी जोशी,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदी मंडळी उपस्थित होते. भय्याजी जोशी यांना बापूराव मांडे यांच्या कौतुक केले. ‘मांडे यांच्यामुळे जिह्यात भाजपचा विकास झाला.मांडे यांनी संघाने जबाबदारी दिल्यास ती समर्थपणे पार पडू’, असे सांगितले, मात्र जबाबदारी दिली नाही तरी ते शेवटपर्यंत संघासाठीच काम करतील याची खात्री असल्याचे सांगत भय्याजी जोशींनी मांडे यांची स्तूती केली.

Related posts: