|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » थोर पुरूषांचे साहित्य महाविद्यालय ग्रंथालयात अनिवार्य

थोर पुरूषांचे साहित्य महाविद्यालय ग्रंथालयात अनिवार्य 

विजय पाटील /सरवडे :

थोर राष्ट्रीय पुरूषांचे साहित्य राज्यातील सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी राज्य शासनाने सवलतीच्या दरात उपलब्ध केले असून ते सर्व शासकीय मुद्रणालयामध्ये विक्रीस देखील ठेवले आहे. असे साहित्य सर्व विद्यार्थी व जनतेपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये व शासकीय ग्रंथालये या ठिकाणीही ते उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानुसार थोर नेत्यांवरील प्रकाशीत झालेले साहित्य व भविष्यात त्यांच्यावर प्रकाशीत होणारे सर्व खंड विद्यापीठ, महाविद्यालये व शासकीय ग्रंथालयात ठेवणे अनिवार्य करण्यात येणार आहे.

देशाच्या जडणघडणीत अनेक नेत्यांचा सहभाग आहे. या थोर नेत्यांच्या सामाजीक कार्यामुळे विविध क्षेत्रात क्रांती झाली. यामध्ये महाराष्ट्रातील थोर नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराम फुले, राजर्षि शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा समावेश आहे. या नेत्यांचे चरित्र व काम लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे असल्याने त्यांच्या कार्याची माहीती ग्रंथ व पुस्तक रूपाने तयार करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, महात्मा जोतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, राजर्षि शाहू चरित्र साधने प्रकाशन समिती, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. या समित्यांनी या थोर नेत्यांवर विविध प्रकारची महत्वपूर्ण अशी ग्रंथ संपदा प्रकाशीत केली आहे. 

Related posts: