|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » काळा मारूती मंदिरास 1100 किलो फुलांची आरास

काळा मारूती मंदिरास 1100 किलो फुलांची आरास 

प्रतिनिधी /इचलकरंजी:

     गोकुळ चौक येथील संस्थान काळातील ग्रामदैवत श्री काळा मारूती मंदिरच्या वर्धापन महोत्सवानिमित्त मंदिरास 1100 किलो फुलांची आरास महिला भक्तांमार्फत करण्यात आली आहे. श्रीमंत घोरपडे सरकार यांनी या मंदिराची स्थापना केली असून येथ्नील मारूती मुर्ती वैशिष्टयपुर्ण आहे.

      या मंदिरातील काळा मारूतीच्या उजव्या हातामध्ये संजीवनी असून डाव्या हातामध्ये गदा आहे. तर मारूतीचा देह पूर्वेस असून मुख दक्षिणेकडे आहे. भाविकांमध्ये हा संजीवनी देणारा मारूती आहे अशी श्रध्दा आहे. मंदिरामध्ये सत्संग सोहळा सुरू असून भक्त मंडळामार्फत आरती केली जाते. मंदिरामध्ये रामचरित मानस संगीत पारायण सुरू असून रोज 7 ते 9 सांप्रदाईक किर्तन आहे. तसेच 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजलेपासून महाप्रसादाचे वाटप होणार आहे.

    सत्संग सोहळा पार पाडणेसाठी मंडळाचे संस्थापक श्रीकांत टेके, सुभाष तोडकर, संदिप खंडेलवाल, देवराज जोशी, ब्रिजमोहन चितलांग्या, गोविंद बजाज, शांताराम मगदूम, विनायक दुधाणे, रामदेव राठी, शामराव शिंदे, श्यामसुंदर बांगड, किशोर मेटे, विनायक सुर्यवंशी, वैशाली गजगेश्वर, भरत सपाटे, विष्णु डाके, धीरज होगाडे, सागर मुसळे, नाना मुसळे यांच्यासह महिला भक्तांनी परिश्रम घेतले. मार्गशीर्ष पंचमी सकाळी राधाकिशनजी महाराज यांच्या 1000 हजार भक्तांनी प्रभात फेरी काढणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष नंदु पाटील यांनी प्रसिध्दी सांगितले. 

 

 

Related posts: